शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

‘मातृवंदनेत’ सोलापूर जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग अव्वल,  ६ हजार ६७३ गर्भवती मातांची नोंदणी पूर्ण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 09:16 IST

केंद्र सरकारने गभर्वती महिला आणि बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी सुरू  केलेल्या पंतप्रधान मातृवंदना योजनेच्या अंमलबजावणीत सोलापूरजिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग अव्वल ठरला आहे. आरोग्य विभागाने अवघ्या पंधरवड्यात ६ हजार ६७३ गरोदर मातांची नोंदणी पूर्ण केली आहे.

ठळक मुद्देआरोग्य विभागाने अवघ्या पंधरवड्यात ६ हजार ६७३ गरोदर मातांची नोंदणी पूर्ण केलीया कामात आशा वर्कर आणि वैद्यकीय अधिकाºयांची भूमिका महत्त्वाची राहिलीकेंद्र सरकारने राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा २०१३ मधील तरतुदीच्या आधारे १ जानेवारी २०१७ पासून मातृवंदना योजना सुरू केली

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ६ : केंद्र सरकारने गभर्वती महिला आणि बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी सुरू  केलेल्या पंतप्रधान मातृवंदना योजनेच्या अंमलबजावणीत सोलापूरजिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग अव्वल ठरला आहे. आरोग्य विभागाने अवघ्या पंधरवड्यात ६ हजार ६७३ गरोदर मातांची नोंदणी पूर्ण केली आहे. यातील काही मातांच्या बँक खात्यावर १ लाख ७० हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. या कामात आशा वर्कर आणि वैद्यकीय अधिकाºयांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा २०१३ मधील तरतुदीच्या आधारे १ जानेवारी २०१७ पासून मातृवंदना योजना सुरू केली. या योजनेतून गर्भवती महिलेच्या पहिल्या अपत्यावेळी तीन टप्प्यात ५ हजार रुपये देण्यात येतात. यासाठी लाभार्थ्यांची यादी संकेतस्थळावर अपलोड करावी लागते. सुरुवातीला निवडक जिल्ह्यात सुरू असलेल्या योजनेचे काम डिसेंबर २०१७ पासून सोलापुरातही सुरू झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड आणि जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी प्रथम सर्व वैद्यकीय अधिकाºयांची बैठक घेऊन या कामाला गती दिली. जिल्हास्तरावर संनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला. अधिकाºयांनी हे काम मिशन मोडवर घेतले. आशा वर्करच्या माध्यमातून जमवलेली माहिती वैद्यकीय अधिकाºयांनी संकेतस्थळावर अपलोड केली. माहिती अपलोड करण्याच्या कामी पुणे, सातारा जिल्ह्यांनंतर सोलापूरच्या आरोग्य विभागाने अव्वल क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्यातील २५ हजार मातांपर्यंत ही योजना पोहोचविण्याचे उद्दिष्ट डॉ. भारुड यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.------------------कागदपत्रांसाठी शिबीरही घेतले- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव म्हणाले की, या योजनेमार्फत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा होतात. सुरुवातीला काही गर्भवती महिलांचे आधार कार्ड, ओळखपत्राअभावी बँक खाते नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे यासाठी स्वतंत्र शिबीर घेण्यात आले. या शिबिरामुळे बँक खाती उघडणे सोपे गेले.--------------------- १ लाख ७० हजार रुपये खात्यावर जमा- डिसेंबरमध्ये ६ हजार ६७३ गर्भवती मातांची नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे. या मातांच्या बँक खात्यावर अनुदान जमा व्हावे, यासाठी तीन टप्प्यातील १४ हजार ६१६ अर्ज भरून घेण्यात आले आहेत. यातील काही मातांच्या खात्यावर १ लाख ७० हजार रुपयांची रक्कम जमा झाली आहे. उर्वरित मातांच्या खात्यावर निकषानुसार अनुदानाची रक्कम जमा होईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद