शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अरणगावच्या घराघरात काचकामाचे कारागीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 12:35 IST

शेकडो तरुणांना मिळू लागला रोजगार; दररोज पाचशे ते हजार रुपयांपर्यंत मजुरी

ठळक मुद्देबार्शीपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या अरणगावातील जमीनही मुरमाड शेती व दुग्ध व्यवसाय हा गावाचा पारंपरिक व्यवसायकोणाच्याही घरी बांधकाम सुरु असताना तुम्ही गेलात आणि चौकशी केली तर सदरचा कारागीर हा मी अरणगावचा असल्याचे अभिमानाने सांगतो.

शहाजी फुरडे-पाटील

बार्शी : बार्शीपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेले अरणगाव हे दीड हजार लोकवस्तीचे गाव. शेती, मोलमजुरी, वीटभट्टीला माती पुरविणे हा गावाचा पारंपरिक व्यवसाय; मात्र गावातील भाऊसाहेब बब्रुवान खराडे यांच्या अ‍ॅल्युमिनियम सेक्शनच्या व्यवसायाने गावातील तरुणांचे जीवनच बदलले. त्यांनी सुरू केलेल्या या व्यवसायामुळे आज गावातील प्रत्येक घरातील युवक या व्यवसायात स्थिरावला असून दररोज ५00 ते एक हजार रुपये रोजगार या तरुणांना मिळू लागला आहे. गावात शक्यतो असे घरच नाही त्यांचा मुलगा या व्यवसायात नाही. 

बार्शीपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या अरणगावातील जमीनही मुरमाड आहे. शेती व दुग्ध व्यवसाय हा गावाचा पारंपरिक व्यवसाय असून, गेल्या १५-२0 वर्षांपूर्वी आपल्या शेतातील वरील भागाची माती वीटभट्टी व्यावसायिकांना विकण्याचे व त्यावरच मोलमजुरी करून घर चालवायचे हेच या गावाचे वैशिष्ट्य होते; मात्र गावातील भाऊसाहेब बब्रुवान खराडे यांनी पुण्यामध्ये अ‍ॅल्युमिनियम सेक्शनच्या व्यवसायात काही दिवस काम केले व नंतर औरंगाबादमध्ये स्वत:चा व्यवसाय सुरु केला. त्यांनी त्या व्यवसायामध्ये गावातील काही मुले कामासाठी नेली. अनुभव मिळाल्यानंतर त्यातील काहीजणांनी गावाकडे व्यवसाय सुरु केला. आज बार्शी शहरात अरणगावातील आण्णा काजळे, गणेश काजळे, लालासाहेब विधाते, सचिन झोडगे, कृष्णा झोडगे, दादा झोडगे, मारुती शिंदे, शांतीलाल कदम या आठ जणांचा स्लाईडिंग विंडो व काच कामाचा व्यवसाय आहे. एकाचे बघून एक गावातील युवक या व्यवसायात कारागीर म्हणून स्थिरावले आहेत. 

कोणाच्याही घरी बांधकाम सुरु असताना तुम्ही गेलात आणि चौकशी केली तर सदरचा कारागीर हा मी अरणगावचा असल्याचे अभिमानाने सांगतो. काच काम व स्लाईडिंग विंडोबरोबरच लाईटची कामे करणारे अनंता खराडे, दामोदर मांडवे, हणमंत चापले, संतोष मिस्कीन तर प्लंबिंगचे काम करणारे सुयोग चापले, गोकुळ चापले व धीरज झोडगे तर दिनेश काजळे व सचिन झोडगे हे पीओपीचे काम करतात. गावामध्ये नोकरीमध्ये असणाºयांचे प्रमाण अत्यल्प असून शेती, काच काम व दुग्ध व्यवसाय हा गावाचा उत्पन्नाचा प्रमुख आधार बनला आहे. 

सर्वच क्षेत्रातील कारागीरगावामध्ये स्लाईडिंग विंडोचे काम करणारे ५0, लाईट फिटिंग करणारे १५ ते २0 व प्लंबिंग, गवंडी काम करणारे २५ कारागीर गावात आहेत. एकंदरीत घराचे पूर्ण काम करण्यासाठी लागणाºया सर्व क्षेत्रातील कारागीर या गावात असल्याचे लखन क्षीरसागर यांनी सांगितले. या कारागिरांना १५ ते ३० रुपये फुटावर मजुरी मिळते. एक कारागीर साधारणपणे ५० ते १०० फूट दररोज काम करतो. या कामातून त्यांना दिवसाला ५०० ते १००० रुपये रोजगार मिळतो. त्यामुळे या गावाची प्रगतीकडे वाटचाल सुरु आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूर