शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

वीर जवान तुझे सलाम; शहीद धनाजी होनमाने यांचे पार्थिव पुळूजमध्ये दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 13:18 IST

शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार; पालकमंत्र्यासह जिल्हा व पोलीस प्रशासनातील अधिकारी दाखल

सोलापूर : गडचिरोली येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पुळूज (ता़ पंढरपूर) येथील शेतकरी कुटुंबातील जवान धनाजी होनमाने यांना वीरमरण आले आहे़ त्यांचे पार्थिव गडचिरोलीमधून सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास पुळूजमध्ये दाखल झाले. त्यांच्यावर शासकीय इतमामात थोड्याच वेळात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

शीघ्र कृती पथक (क्यूआरटी) आणि विशेष अभियान पथकाचे जवान रविवारी सकाळी ६ वाजेपासून संयुक्तपणे नक्षलविरोधी अभियान राबवीत होते. ६.३० च्या सुमारास दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार केला.  पोलिसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. पण नक्षलवाद्यांच्या गोळीने क्युआरटी पथकाचे उपनिरीक्षक होनमाने हे शहीद झाले. शहीद झाल्याची वार्ता पुळूज येथे समजताच पुळूज गावावर शोककळा पसरली.

सोमवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शहीद होनमाने यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी बोलताना पालकमंत्री भरणे म्हणाले की, शहीद होनमाने यांच्या कुटुंबियांना शासनाच्यावतीने सर्वोतोपरी मदत केली जाईल, त्यांच्या भावाला शासकीय नोकरी तर आई-वडिलांना पेन्शन मिळवून देण्याचाही प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सागर कवडे यांच्यासह अन्य शासकीय अधिकारी व पोलीस अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरGadchiroliगडचिरोलीSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसPandharpurपंढरपूर