शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण ; सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत ११५ गाड्यांची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 13:26 IST

१९ ते २५ जुलै या सात दिवसात सोलापूर जिल्ह्यात विविध विभागाच्या ११5 बस फोडण्यात आल्या. 

ठळक मुद्देप्रवाशांना घेऊन जाताना रोडवर बसच्या काचा फोडण्याचे सत्र सुरु सामान्य जनतेचीच सेवा करणाºया बसवर दगडफेकीच्या घटना घडू नयेत

सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीवरुन सुरु झालेल्या आंदोलनाचा सर्वाधिक फटका सार्वजनिक मालमत्ता असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीला अर्थात बसला बसू लागला आहे. आज गुरूवारीही जिल्ह्यातील विविध भागात गाड्यांवर दगडफेक करून नुकसान झाल्याची माहिती एस. टी. प्रशासनाकडून देण्यात आली. १९ ते २५ जुलै या सात दिवसात सोलापूर जिल्ह्यात विविध विभागाच्या ११३ बस फोडण्यात आल्या. 

मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चक्का जाम, रस्ता रोकोच्या माध्यमातून सोलापूरसह महाराष्टÑभर आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनाची धग दिवसेंदिवस वाढत असताना याचा झळ प्रवाशांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला बसत आहे. प्रवाशांना घेऊन जाताना रोडवर बसच्या काचा फोडण्याचे सत्र सुरु आहे. बुधवारी दिवसभरात विविध ठिकाणी चार ठिकाणी अशा घटना घडल्या. 

वाडीकुरोली येथे दुपारी सव्वाच्या सुमारास कुर्डूवाडी आगाराची एम.एच. १४ बीटी ३१०८ ही बस जुन्नर ते कुर्डूवाडीकडे जात असताना अज्ञात इसमांनी दगडफेक करुन बसच्या समोरची काच फोडली. यामध्ये १८ हजारांचे नुकसान झाले. दुपारी दोनच्या सुमारास सांगोला आगाराची सोलापूर-सांगोला ही एम. एच. ०७ सी ७३५८ या बसवर दगड मारल्याने पाठीमागील काच फुटून ५ हजार रुपयांचे नुकसान झाले. वाडेगाव फाट्याजवळ ही घटना घडली. सांगोला तालुक्यातील देवडी फाट्याजवळही एम.एच. ०९ ईएम १३८२ या शिवाजीनगर-तुळजापूर बसला लक्ष्य कण्यात आले. दुपारी ४.३० च्या दरम्यान हा प्रकार घडला. यात बसचे ३ हजार रुपयांचे नुकसान झाले. पंढरपूरजवळ विसावा थांबा येथे मंगळवेढा आगाराची एम.एच. २० एन ८४२२ ही बस फोडली. बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमाराला ही घटना घडली. यात महामंडळाचे ८ हजार रुपयांचे नुकसान झाले.

दगडफेकीची झळ सामान्य जनतेलाच - सकल मराठा समाजाच्या वतीने वारकºयांची गैरसोय होऊ नये म्हणून मंगळवारी सोलापूर आगारास बस सुरु ठेवण्याचे  निवेदन देण्यात आले. त्यानंतरही या घटना घडत आहेत. आंदोलन कोणतेही असो त्याला हिंसक वळण मिळू नये, सामान्य जनतेचीच सेवा करणाºया बसवर दगडफेकीच्या घटना घडू नयेत. त्याची झळ जनतेला बसू शकते. संयम बाळगावा, अशा भावना जनतेतून व्यक्त होत आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरST Strikeएसटी संपMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा