शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात घुसण्याचा अनेकांचा प्रयत्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 12:43 IST

सोलापूर शहर मध्य;  बहुजन वंचित आघाडीबरोबर माकप गेल्याने चित्र बदलणार, युतीवर सेनेचे भवितव्य

ठळक मुद्देसोलापूर लोकसभेसाठी जशी अटीतटीची तिरंगी लढत या मतदारसंघात झाली हीच स्थिती विधानसभेला दिसेलनिवडणूक लोकसभेची असली तरी प्रचारात पाणीपुरवठा, बेकारी, कारखानदारांचे प्रश्न यावरच लक्ष केंद्रित माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पूर्वभागातील ज्येष्ठ नेत्यांना एकत्रित ठेवण्यावर लक्ष केंद्रित

राजकुमार सारोळे 

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या तापलेल्या वातावरणाचा फायदा घेत सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश कोठे, माकपचे माजी आमदार नरसय्या आडम, भाजपचे माजी विरोधी पक्षनेते पांडुरंग दिड्डी यांनी साखरपेरणी केली आहे. 

शहर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे सलग दोन वेळा निवडून आल्या आहेत. गेल्या वेळेस या मतदारसंघावर महेश कोठे यांनी हक्क सांगितला, पण त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते काँग्रेसमधून बाहेर पडले. एमआयएमचे तौफिक शेख व भाजपच्या मोहिनी पतकी यांच्याबरोबर शिंदे यांची लढत झाली. यावेळेस या मतदारसंघात पुन्हा इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये इच्छुकांनी आपली  फळी मजबूत करण्याचा प्रयत्न  केला आहे. 

आमदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या मतदारसंघावर पकड मजबूत ठेवली आहे. सतत मतदारसंघातील लोकांच्या संपर्कात राहून त्यांचे प्रश्न सोडविण्यावर त्यांनी भर दिला आहे. लोकसभा निवडणुकीत तर त्यांनी आपला मतदारसंघ पिंजून काढला.  सर्वात जास्त सभा त्यांनी आपल्या मतदारसंघात घेतल्या. या मतदारसंघात विडी, यंत्रमाग व कारखान्यातील कामगारांची संख्या जास्त आहे.

त्याचबरोबर घरेलू, बांधकाम कामगारांची मोठी वस्ती आहे. या कामगारांचे प्रश्न घेऊन लोकसभेच्या प्रचाराचा धुराळा उडविण्यात आला. विभानसभेचे गणित ओळखून माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी अल्पसंख्याक लोकांसाठी मोठी घरकुल योजना मंजूर करून काम सुरू केले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने साथ न मागितल्याने त्यांनी बहुजन वंचित आघाडीबरोबर काम करणे पसंत केले. बहुजन वंचित आघाडीत एमआयएम आहे. गेल्या वेळेस एमआयएमच्या उमेदवाराने चांगली ताकद उभी केली होती. विधानसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीची ताकद मिळाली तर मोठा फायदा होईल म्हणून त्यांनी प्रचाराला जोर दिला. 

शहर मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश कोठे यांचे सर्वात जास्त नगरसेवक आहेत. या नगरसेवकांच्या माध्यमातून त्यांनी जुने व नवीन विडी घरकुल, निलमनगर भागात मोठी ताकद उभी केली. विधानसभेचे गणित घालून त्यांनी शिवसेनेत जाण्याच्या निर्णय घेतला. पण विधानसभेच्या वेळेस युती होईल की नाही, याबाबत अनिश्चिततेचे वातावरण असल्याचे बोलले जात आहे. 

कोणाची ताकद वाढणार?- लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आमदार प्रणिती शिंदे यांनी आपला मतदारसंघ पिंजून काढला तर पुढील गणिते मांडून आडममास्तर, महेश कोठे यांनी या भागात लक्ष केंद्रित केले. शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना एकत्र केले. भाजपतर्फे पांडुरंग दिड्डी यांनी या मतदारसंघाच्या प्रचाराची धुरा सांभाळली. त्याचबरोबर नगरसेवक नागेश वल्याळ, मोहिनी पतकी यांनीही तयारी केली आहे. बहुजन वंचित आघाडीनेही या मतदारसंघात आपली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे. 

लोकसभेसारखीच स्थिती राहणार- सोलापूर लोकसभेसाठी जशी अटीतटीची तिरंगी लढत या मतदारसंघात झाली हीच स्थिती विधानसभेला दिसेल असे इच्छुकांच्या डावपेचावरून दिसत आहे. निवडणूक लोकसभेची असली तरी प्रचारात पाणीपुरवठा, बेकारी, कारखानदारांचे प्रश्न यावरच लक्ष केंद्रित करण्यात आले.  माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पूर्वभागातील ज्येष्ठ नेत्यांना एकत्रित ठेवण्यावर लक्ष केंद्रित केले.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरPoliticsराजकारणPraniti Shindeप्रणिती शिंदेSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदे