शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

गॅस गोडाऊन शेजारी मन्ना जुगार; पोलिसांनी केली पाच जणांना अटक

By संताजी शिंदे | Updated: September 18, 2023 19:10 IST

कुर्डूवाडी : शहरातील गॅस गोडाऊन शेजारी सुरू असलेल्या मन्ना जागार अड्ड्यावर धाड टाकून, पोलिसांनी पाच जणांना पकडून कारवाई केली. ...

कुर्डूवाडी : शहरातील गॅस गोडाऊन शेजारी सुरू असलेल्या मन्ना जागार अड्ड्यावर धाड टाकून, पोलिसांनी पाच जणांना पकडून कारवाई केली. जुगारातील दोन हजार ८०० रूपये जप्त केले. या प्रकरणी कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल  झाला आहे.

       दर्शन शर्मा,यश दाभाडे,विकास इंगोले,प्रवीण इंगोले,सोमेश राजू कांबळे (सर्व रा. कुर्डूवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान खासगी वाहनाने पेट्रोलिंग सुरू होती. दरम्यान गोपनीय बातमीदाराकडून कुर्डूवाडी शहरातील गॅस गोडाऊन शेजारी पत्रा शेडच्या आडोशाला काही इसम मन्ना नावाचा पत्त्याचा जुगार खेळत असल्याची माहिती समजली. पोलिस घटनास्थळी गेल्यानंतर त्यांना पाचजण गोलाकार बसून  पत्त्याची पाने टाकून मन्ना नावाचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी तात्काळ धाड टाकून पाच जणांना पकडले. जुगारात पैसे लावण्यात आले होते.  पोलिसांनी पत्त्याचा डाव व रोख २ हजार ८०० रुपये जप्त करुन पाच जणांवर कारवाई केली. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सागर रामदास भोगे यांनी कुर्डूवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी