शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

विजयदादांना माळशिरसने तारले माढा मतदारसंघ :सदाभाऊंशी अटीतटीची लढत

By admin | Updated: May 17, 2014 01:12 IST

सोलापूर: राष्टÑवादी आघाडीचे उमेदवार विजयसिंह मोहिते - पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांच्यात अटीतटीची लढत झाली.

माळशिरस विधानसभा मतदारसंघात राष्टÑवादीला मिळालेल्या ३९०६९ मतांच्या मोठ्या आघाडीमुळे या लढतीत विजयसिंहांना २५३४४ मतांनी राष्टÑवादीचा गड राखता आला. देशभरातील प्रस्थापितांविरोधातील लाट माढा मतदारसंघातही असल्याचे विधानसभानिहाय मतमोजणीच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. येथील रामवाडी शासकीय गोदामात सकाळी ८ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. पावणेबाराच्या सुमारास पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला. तेव्हा सदाभाऊ यांनी विजयसिंहांवर ९७० मतांची आघाडी घेऊन आश्चर्याचा धक्का दिला. करमाळा (१४६२३), सांगोला (१४४७६) आणि फलटण (६०६) या विधानसभा मतदारसंघात खोत यांनी आघाडी घेतल्यामुळे राष्टÑवादीच्या गोटात सन्नाटा पसरला होता; पण माळशिरस विधानसभा मतदारसंघाने विजयसिंहांना साथ दिली अन् खोतांनी घेतलेली आघाडी तुटू लागली. विजयसिंहांनी माळशिरसमध्ये ३९०६९ मतांची मोठी आघाडी घेतली. त्यानंतरच्या फेर्‍यांमध्ये राष्टÑवादीची आघाडी वाढत गेली. विजयसिंहांनी माढा (१४२२५), माण (१६५२)मध्ये आघाडी घेत सदाभाऊंना मात दिली. या मतदारसंघातील मतमोजणीच्या सहा फेर्‍यांमध्ये १०८०१८७ मते पात्र ठरली. त्यापैकी विजयसिंहांना ४८९९८९ मते तर सदाभाऊंना ४६४६४५ मते मिळाली. मोहिते - पाटील घराण्यात बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार प्रतापसिंह मोहिते - पाटील यांना २५१८७ मते मिळविता आली. बहुजन समाज पक्षाचे कुंदन बनसोडे हे १५७९० मते घेऊन चौथ्या स्थानावर आले तर आम आदमी पक्षाच्या सविता शिंदे यांना केवळ ७१६० मते मिळाली.