शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

गंभीर दौऱ्यात थिल्लर स्टेटमेंट करणं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शोभत नाही: देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 21:26 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

टेंभुर्णी :  लोकांना काय मदत करणार हे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारच्या गंभीर दौर्‍यात थिल्लर स्टेटमेंट करणे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. लोकांना मदत करण्याची यांच्यात हिम्मत नाही. मुख्यमंत्री दोन तीन तासाचा प्रवास करून थोड्या काळासाठी बाहेर पडले आहेत. यावेळी लोकांनी त्यांना काय प्रतिसाद दिला माहीतच आहे. अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी केली.

अतिवृष्टीमुळे माढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या पाहणी दौऱ्यानिमित्त माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस माढा तालुक्यातील गारअकोले,  चांदज व टाकळी येथे आले होते. यावेळी गारअकोले येथील भीमानदीवरील फुलावर शेतकऱ्यांची गार्‍हाणी ऐकल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. केंद्र सरकारने आमचे पैसे अडकले आहेत ते अगोदर द्यावेत असे मुख्यमंत्री म्हणतात, यावर बोलताना फडणवीस म्हणाले की राज्याकडून जीएसटी कमी आला आहे.  त्याची भर काढण्यासाठी केंद्राने कर्ज काढून राज्याला पैसे दिले आहेत.

मुख्यमंत्री फक्त टोलवाटोलवी करत आहेत. काहीही झाले की केंद्राकडे बोट दाखवायचे. तुमच्या किंमत नाही का? आम्ही सत्तेत असताना १० हजार कोटीची मदत लोकांना दिली होती. यांना मदत करायची नाही. राज्याला १ लाख 20 हजार कोटी कर्ज काढण्याची क्षमता दिलेली आहे. हे फक्त लोकांची दिशाभूल करतात.

विरोधी पक्ष नेते यांनी आज माढा तालुक्यातील गार कोले, चांदज व टाकळी या गावात भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली व लोकांची व्यथा जाणून घेतली. माजी मुख्यमंत्री फडवणीस व  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील हे दुपारी तीन तीस वाजता गार कोले येथील भीमा नदीवरील पुलावर दाखल झाले. यावेळी त्यांनी आपद्ग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या व्यथा जाणून घेऊन दिलासा दिला.

यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार जय सिद्धेश्वर स्वामी, माजी मंत्री विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार प्रशांत परिचारक, आमदार राजेंद्र राऊत, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार लक्ष्मण ढोबळे, भाजपा जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख, माढा तालुका अध्यक्ष योगेश बोबडे आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी