शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांना स्वावलंबी बनवण्यासाठी सोलापुरात किसान कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 15:34 IST

शासन आपल्या दारी उपक्रम, शेतकºयांना उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प

ठळक मुद्देप्रत्येक तालुक्यात गटस्तरावर किसान कल्याण दिवस शेतकºयांची पीकनिहाय यशोगाथा दाखवण्यात येणार योजनांची माहिती शेतकºयांना दिली जाणार

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील पीक उत्पादकता वाढवून शेतकºयांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य लाभावे त्यांनी स्वावलंबी बनावे यासाठी बुधवारी २ मे २०१८ रोजी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी ११ वाजता किसान कल्याण कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी दिली. 

कृषी संलग्न विभागाच्या योजनांची शेतकºयांना माहिती अवगत असणे गरजेचे आहे. शासन आपल्या दारी उपक्रमांतून शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा शासनाचा संकल्प आहे. कृषी व संलग्न विभागाकडील योजनांची माहिती शेतकºयांना मिळावी यासाठी ही कार्यशाळा आयेजित केली आहे. शेतीचे उत्पन्न दुप्पट व्हावे, शेतकºयांची आर्थिक स्थिती सुधारावी  आणि  शेतकरी स्वयंनिर्भर होण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत  केंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजना राबवण्यात येत आहेत.  कृषी विभागाकडील विविध योजनांची एकत्रित माहिती शेतकºयांमार्फत पोहोचत नसल्यामुळे अनेक शेतकरी योजनांपासून वंचित राहतात. हे टाळण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली आहे.

 किसान कल्याण कार्यशाळेत कृषी, आत्मा, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, जलसंधारण, कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर, कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ, विभागीय कृषी संशोधन केंद्र, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र  या विभागांकडील योजनांची माहिती देण्यात येणार आहे.  कार्यशाळेसाठी तालुक्यांचे लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती            सदस्य, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य, प्रगतिशील शेतकरी, कृषी सहायक, शेतकरी मित्र यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  बसवराज बिराजदार व आत्माचे  प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे यांनी केले आहे.

तालुक्यात गटस्तरावर किसान कल्याण दिवस- शासन आपल्या दारी’ या संकल्पनेवर शेतकºयांच्या हितासाठी तसेच शेतकºयांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याच्या केंद्र व राज्य शासनाकडून राबवल्या जाणाºया योजनांची माहिती शेतकºयांपर्यत पोहोचवण्यासाठी  प्रत्येक तालुक्यात गटस्तरावर किसान कल्याण दिवस आयोजित केला जात आहे.  यावेळी  कृषी विभागाकडील योजनांची माहिती  पत्रकाच्या स्वरुपात जिल्हा व तालुका स्तरावरील वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केलेल्या शेतकºयांची पीकनिहाय यशोगाथा दाखवण्यात येणार आहे. तसेच विविध विभागातील योजनांची माहिती शेतकºयांना दिली जाणार आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरagricultureशेतीgovernment schemeसरकारी योजनाSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय