शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

मैत्रेने घातला चार हजार लोकांना गंडा, आर्थिक गुन्हे शाखेची माहिती, दोघांना अटक , कागदपत्रे व संगणक जप्त

By admin | Updated: June 7, 2017 14:41 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ७ : गुंतवणुकीच्या नावाखाली हजारो ठेवीदारांकडून लाखो रुपए गोळा करुन ठेवी परत करण्यास टाळाटाळ करणाऱ्या मैत्रेय कंपनीच्या चेअरमनसह पाचजणांविरुध्द सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी युवराज साखरे, कृ ष्णहरी अंबाजी सामलेटी (रा. सोलापूर) या दोघांना अटक केली आहे. तर मैत्रेने जिल्ह्यात चार हजार लोकांची फसवणुक केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.शहरातील मैत्रेय प्लॉटर्स अण्ड स्ट्रक्चरर्स प्रा. लि़ या कंपनीत नागरिकांनी ७ ते ८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. जानेवारी २०१६ पासून या कंपनीचे कार्यालय बंद करण्यात आले.आर्थिक गुन्हे शाखेने ह्यमैत्रेयह्णचेअरमन व संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली.गुन्ह्या चा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे करत आहेत. राज्यात हजारो गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या मैत्रेयने अवघ्या एका वर्षात बाजारात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली होती. मैत्रेयने ग्राहकांकडून अब्जावधी रुपये उकळले; मात्र गुंतवणूकदारांना कोरड्या आश्वासनापलीकडे काहीही दिले नाही. दुसरीकडे या गुंतवणूकदारांच्या रकमेतून मैत्रेयच्या संचालकांनी वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून लाखो रुपयांची माया गोळा केली.------------------तक्रारीचा आकडा वाढलामैत्रेय प्लॉटर्स अ‍ॅण्ड स्ट्रक्चर्स प्रा. लि. ने सोलापुरातील नागरिकांना चालू ठेव, मुदत ठेव, सुवर्णसिद्धी अशा तीन प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास लावून त्यांना जास्त लाभाचे अमिष दाखवले. आर्थिक गुन्हे शाखेकडे बुधवारी १०० जणांनी मैत्रेये विरुध्द तक्रारी दाखल केल्या आहेत. यात ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांचा समावेश आहे. मैत्रे कंपनीत १० हजार नागरिकांनी गुतवणुक केली होती. त्यातील ६ हजार लोकांना मैत्रेने त्यांचे पैसे परत केले. चार हजार लोकांना अद्याप पैसे परत मिळाले नाहीत.----------------------संगणक कागदपत्रे जप्तआर्थिक गुन्हे शाखेने सोलापूरातील मैत्रेच्या कार्यालयास सिल ठोकुन काही कागदपत्रे व संगणक जप्त केल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी दिली. दरम्यान अन्य आरोपींना ही लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.--------------------------आर्थिक गुन्हे शाखेचे ठेवीदारांना आवाहनज्या ठेवीदारांनी ठेव स्वरूपात मैत्रेय कंपनीत रकमेची गुंतवणूक केलेली आहे व त्यांना कंपनीकडून परतावा मिळालेला नसेल, त्या ठेवीदारांनी मूळ कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.