शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

‘मध्य’ मध्ये बंडखोरी कायम करत महेश कोठेंनी दिले ‘युती’ला ‘उत्तर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 15:49 IST

शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा; माघारीसाठी ‘मातोश्री’हून केले गेलेले प्रयत्नही निष्फळ 

ठळक मुद्देशहर मध्यमधून महेश कोठे निवडणूक लढविणार का याकडे सोमवारी सर्व राजकीय मंडळींचे लक्ष लागले होतेसेनेने दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर केल्यापासून ते अस्वस्थ होते

सोलापूर : शहर मध्यमधून अर्ज माघारी घेण्याकरिता महेश कोठे यांच्यावर सोमवारी अनेकांकडून दबाव होता; मात्र ते शेवटपर्यंत उमेदवारी कायम ठेवण्यावर ठाम राहिले़ सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या निकटवर्तीयांनी कोठे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर काही जणांनी कोठे यांना मध्य मधून नको  ‘उत्तर’मधून लढा  असा आग्रह धरला मात्र कोठे यांनी भाजप-सेनेच्या युतीला शहर उत्तरमधून माघार घेत ‘उत्तर’ दिल्याचे दिसून आले. 

शहर मध्यमधून महेश कोठे निवडणूक लढविणार का याकडे सोमवारी सर्व राजकीय मंडळींचे लक्ष लागले होते. सेनेने दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर केल्यापासून ते अस्वस्थ होते. त्यामुळे शहर मध्यमधून त्यांनी माघार घ्यावी असा आग्रह सुरू होता. 

मातोश्रीवरून याबाबत निरोप येत होते. खासदार राहुल शेवाळे हे त्यांच्या संपर्कात होते असे सांगण्यात आले. स्थानिक नेत्यांनी त्यांना उत्तरमधून लढा असा आग्रह केला. पण कोठे यांनी दुपारपर्यंत कोणालाच प्रतिसाद दिला नाही़ परंतु त्यांनी दुपारी पावणेतीन वाजता शहर उत्तर मतदारसंघातून माघार घेतली़ त्यांनी या मतदार संघातून माघार घेतल्यामुळे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना दिलासा मिळाला आहे.

त्याचबरोबर शहर मध्य मध्ये केलेल्या बंडखोरीचा परिणाम होणार असल्याने ‘मातोश्री’वरुन कारवाई होण्यापूर्वीच कोठे यांनी सोमवारी दुपारी शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा पक्ष सचिवाकडे पाठवून दिला.त्यांच्या या निर्णयाने बंडखोरी करण्याबाबत ते किती आक्रमक झाले आहेत, याची चर्चा दिवसभर सुरू होती़ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. 

कोण कोणाच्या पाठीमागे?- प्रभाग ९ मधील भाजपचे नगरसेवक अविनाश बोमड्याल हे महेश कोठे यांचे भावजी आहेत़ त्यामुळे बोमड्याल हे आता युतीचा धर्म पाळणार की त्यांच्या परिवाराच्या बाजूने राहणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. आत्तापर्यंत मात्र ते उघडपणे कोठे यांच्या कार्यक्रमांत दिसलेले नाहीत़ तसेच भाजपच्या नगरसेविका श्रीकांचन यन्नम याही त्यांच्या पाहुण्या आहेत़ त्यांचा कल युतीकडे की कोठे यांच्याकडे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.  भाजपचे काही नगरसेवक सोमवारी सेनेचे उमेदवार दिलीप माने यांच्या बँकेतील बैठकीला गेले होते. युतीचा धर्म पाळण्याचा या बैठकीत निर्धार झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता कोण कोणाच्या पाठीमागे आहे हे लवकरच दिसून येणार आहे. 

सर्व्हेच्या आधारामुळे ठामविधानसभा कोठून लढवावी यासाठी आधीच मी दोन मतदारसंघाचे सर्वेक्षण केले होते अशी माहिती महेश कोठे यांनी दिली़ उत्तर व मध्यमधून केलेल्या सर्व्हेमध्ये बहुतांश लोकांनी मध्यबाबत कौल दिला आहे. आता बदलेली परिस्थिती पाहता पालकमंत्र्यांच्या विरोधातील मंडळीनी मला उत्तरमधून उभे राहण्याबाबत आग्रह केला. पण उत्तरमध्ये माझी यंत्रणा नसल्याने शहर मध्य मधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकsolapur-city-central-acसोलापूर शहर मध्यPoliticsराजकारणPraniti Shindeप्रणिती शिंदे