शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत वैयक्तिक सॅबर प्रकारात महाराष्ट्राची स्नेहल पवार आणि स्नेहल विधाते यांची विजयी सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 17:27 IST

केगाव येथील सिंहगड इन्स्टिट्यूट येथे महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनच्या अधिपत्याखाली आणि सिंहगड इन्स्टिट्यूटच्या सहकायार्ने सुरू झालेल्या २८ व्या वरीष्ठगट राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत शनिवारी "सॅबर" या प्रकारात बाद महिलांच्याया बाद फेरीत महाराष्ट्राच्या स्नेहल पवार आणि स्नेहल विधाते यांनी विजयी सलामी दिली.

ठळक मुद्देसिंहगड इन्स्टिट्यूट कॅम्पसमध्ये  अद्ययावत मैदानावर इलेक्ट्रॉनिक्स आॅपरेटर्सवर राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेला प्रारंभ२५ हुन अधिक राज्यातील सुमारे ८१० खेळाडू आणि पंच दाखलतलवारबाजीचा हा खेळ पाहण्यासाठी मोठी गर्दी महाराष्ट्राच्या मुलींनी बिहार आणि तेलंगणाच्या मुलींना अखेरपर्यंत झुंजवले आणि विजयी सलामी दिली

 आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर : केगाव येथील सिंहगड इन्स्टिट्यूट येथे महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनच्या अधिपत्याखाली आणि सिंहगड इन्स्टिट्यूटच्या सहकायार्ने सुरू झालेल्या २८ व्या वरीष्ठगट राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत शनिवारी "सॅबर" या प्रकारात बाद महिलांच्याया बाद फेरीत महाराष्ट्राच्या स्नेहल पवार आणि स्नेहल विधाते यांनी विजयी सलामी दिली.       सिंहगड इन्स्टिट्यूट कॅम्पसमध्ये  अद्ययावत मैदानावर इलेक्ट्रॉनिक्स आॅपरेटर्सवर शनिवारपासून मोठ्या थाटात राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेला प्रारंभ झाला. २५ हुन अधिक राज्यातील सुमारे ८१० खेळाडू आणि पंच दाखल झाले आहेत. तलवारबाजीचा हा खेळ पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. सिंहगडाचे संचालक संजय नवले यांनी स्पर्धेत भाग घेणाºया खेळाडूंसाठी कोणतीही कसर ठेवलेली नाही.      दरम्यान शनिवारी दिवसभरात सॅबर या वैयक्तिक प्रकारातील महिलांचे बाद फेरीचे सामने झाले.ज्यामध्ये महाराष्ट्राच्याया स्नेहल पवार हिने बिहारच्या निकिता साहू हिचा १५ विरुध्द ११ गुणाने पराभव केला.तर दुसºया सामन्यात महाराष्ट्राच्याच स्नेहल पवार हिने तेलंगणाच्या काव्या हिचा १५ विरुद्ध १० गुणाने पराभव केला.हे दोन्ही सामने सुरवातीला अटीतटीचे झाले. मात्र महाराष्ट्राच्या मुलींनी बिहार आणि तेलंगणाच्या मुलींना अखेरपर्यंत झुंजवले आणि विजयी सलामी दिली.----------------अन्य निकाल पुढीलप्रमाणे ज्योत्स्ना (केरळ ) विजयी विरुद्ध गुंजन ( चंदीगड) १५ -१,जसप्रित कौर (जम्मू काश्मीर ) विजयी विरुद्ध मालवीया (मध्यप्रदेश )१५-७,जगमित (पंजाब  ) विजयी विरुद्ध वनिका ( हरियाणा ) १५-७, कोमल प्रित (पंजाब  ) विजयी विरुद्ध गरिमा (हिमाचल प्रदेश ) १५-३,देवी चेरीश (सेनादल )विजयी विरुद्ध टीना (दिल्ली ) १५-१,रिशा लागू (केरळ ) विजयी विरुद्ध  दिव्या (दिल्ली ) १५-१,देवी दानिया ( मणिपूर )विजयी विरुद्ध अशुकुमारी (बिहार )१५-२, देवी हिरोईन (मणिपूर ) विजयी विरुद्ध श्रेया (सेनादल  )१५-१०,सौम्या ( छत्तीसगड ) विजयी विरुद्ध सोनाली चौधरी (जम्मू काश्मीर  ) १५-१,देवी रेणी (सेनादल  )विजयी विरुद्ध नामचू नाग ( आसाम ) १५-३,संध्या केरोलीन (तामिळनाडू )विजयी विरुद्ध देवी प्रियाराणी (आसाम )१५-२ आणि भवानी (तामिळनाडू ) विजयी विरुद्ध रविना (हिमाचल प्रदेश )१५-२.

टॅग्स :SolapurसोलापूरSportsक्रीडा