शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

माढा तालुक्यातील वाळू माफियांनी केला कुर्डूवाडी प्रांत अधिकाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न

By appasaheb.patil | Updated: March 21, 2024 16:12 IST

प्रांत अधिकाऱ्यांची गाडी व पथक पाहून अवैधरित्या वाळू उपसा करीत असलेले चार ट्रॅक्टर वाळूने भरलेल्या ट्रॉलीसह चालक पळवू लागले, परंतु प्रांत अधिकाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करीत मोठे धाडस दाखवत मोठ्या शिताफितीने त्यांना थांबविले.

लक्ष्मण कांबळे

कुर्डूवाडी : केवड (ता.माढा) येथील सीना नदीतील वाळू उपसा करून रात्रीच्या वेळी बेकायदेशीरपणे चोरून नेहत असल्याच्या तक्रारी कुर्डूवाडी विभागाच्या प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी स्वतःच पथक तयार करत वाळू कारवाईत सामील होत बुधवारी पहाटेच्या सुमारास केवड येथील सिना नदीत अचानकपणे वाळू तस्करांवरती धाड टाकली. यावेळी प्रांत अधिकाऱ्यांची गाडी व पथक पाहून अवैधरित्या वाळू उपसा करीत असलेले चार ट्रॅक्टर वाळूने भरलेल्या ट्रॉलीसह चालक पळवू लागले, परंतु प्रांत अधिकाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करीत मोठे धाडस दाखवत मोठ्या शिताफितीने त्यांना थांबविले.

दरम्यान, त्यातील तीन ट्रॅक्टर चालकाकडून ट्रॅक्टर प्रांताच्या अंगावर घालत मागील ट्रॉलीमध्ये भरलेली वाळू प्रांत अधिकाऱ्यांच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रसंगावधान राखून पथकातील मंडल अधिकारी व तलाठ्याने प्रांत अधिकाऱ्यांना बाजूला ओढले त्यात त्या बालंबाल वाचल्या आहेत. यानंतर चारी ट्रॅक्टरचे चालक आहे तेथून धूम ठोकली.  कुर्डूवाडी विभागाच्या प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांच्या पथकाने कारवाई केली. यामध्ये चार ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त करण्यात आले आहेत. त्यातील तीन रिकामे तर एक ट्रॉली वाळूने भरलेल्या स्थितीत पथकाच्या हाती आली आहे. कारवाईदरम्यान ट्रॅक्टर व ट्रेलर जागेवर सोडून चालकांनी धूम ठोकल्यानंतर पथकातील कोतवाल व तलाठ्यांनी चारही ट्रॅक्टर स्वतः चालवित माढा पोलीस ठाण्याच्या आवारात आणून लावले व पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

दरम्यान, प्रांत अधिकारी प्रियंका आंबेकर यांच्यासह मंडल अधिकारी विशाल गायकवाड, सूर्यकांत डिकोळे, तलाठी प्रवीण बोटे, निलेश मुटकुटे, लक्ष्मण मोगल, नवनाथ शिंदे, बाळासाहेब शिंदे, अतुल दहीटणकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.