शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

वेडाच्या भरात केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क करमाळा : जिंती येथे एकुलत्या एक मुलाने वेडाच्या भरात वृद्ध पित्यास बेदम मारहाण केली. या मारहाणीत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

करमाळा : जिंती येथे एकुलत्या एक मुलाने वेडाच्या भरात वृद्ध पित्यास बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला आहे.

राजाराम मारुती जगताप (वय ७५, रा. जिंती, ता. करमाळा) असे मरण पावलेल्या वृद्ध पित्याचे नाव असून याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अंकुश राजाराम जगताप (वय ४०, रा.जिंती, ता. करमाळा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतले आहे.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार राजाराम जगताप यांना अंकुश नावाचा एकुलता एक मुलगा आहे. तो विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. काही वर्षांपासून मानसिक आजाराने पीडित आहे. काही दिवस मनोरुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. पण तो या आजारातून पूर्णत: बरा झालेला नव्हता.

तो मद्यपान करून दिवसभर रेल्वे गेटवरून गावात चकरा मारत होता. वर्षभरापूर्वी त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी गेली आहे. जगताप यांची वस्ती गावाबाहेर असून जवळपास कोणी नाही. गुरुवार, २ सप्टेंबर रोजी रात्री अंकुश हा दारू पिऊन आला आणि वेडाच्या भरात वडिलास बेशुद्ध पडेपर्यंत मारले.

---------

जिल्हापरिषद सदस्य धावल्या मदतीला

जिल्हा परिषद सदस्या सवितादेवी राजेभोसले यांना सकाळी हा प्रकार समजताच त्यांनी राजाराम जगताप यांना वाहन करून करमाळा येथे हलविले. गंभीर जखमी अवस्थेतील जगताप यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी कुटीर रुग्णालयात पाठवला.