शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुक्तीसाठी दुवा; रमजान महिन्यातील नमाज घरीच अदा करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 15:38 IST

पहिला रोजा बुधवार १४ एप्रिल रोजी होईल

सोलापूर : रमजान महिना हा अल्लाहच्या कृपेचा महिना आहे. या महिन्यात आम्ही सर्व मिळून अल्लाहकडे दुवा मागणार आहोत. जगावर जे कोरोनाचे संकट आले आहे, त्यापासून सकल मानवजातीची रक्षा करण्यासाठीची प्रार्थना या महिन्याभरात करण्यात येईल. ज्यांना हा आजार झाला आहे ते लवकरात लवकर बरे व्हावेत. हा आजार जगभरातून जावा, अशी दुवा मागण्यात येईल, अशी भावना शहर काझी अमजद अली यांनी व्यक्त केली. शासन आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या सूचनेनुसार नियमांचे पालन करत रमजानची नमाज घरीच अदा करा, असेही आवाहन त्यांने केले.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. शासनाने वेळोवेळी जाहीर केलेले नियम सर्वांच्या काळजीपोटीच तयार केले आहेत. या निर्णयाचे पालन सर्वजण करतील, असा विश्वास काझी यांनी व्यक्त केला. रमजान महिन्यात रात्री तरावीहची नमाज अदा करण्यास विशेष महत्त्व आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे रात्री ८ नंतर निर्बंध घालण्यात आले आहेत. ती वेळ एक तासापर्यंत म्हणजेच रात्री नऊपर्यंत वाढवावी, अशी मागणी त्यांनी केली.

आज पहिली तरावीहसोमवार १२ एप्रिल रोजी सोलापूर तसेच देशभरामध्ये चंद्रदर्शन झाले नाही. त्यामुळे  तरावीह १३ एप्रिलपासून सुरू होणार आहे. पहिला रोजा बुधवार १४ एप्रिल रोजी होईल, अशी माहिती शहर काझी यांनी दिली.आदेशाचे पालन करानियमाप्रमाणे बाजार बंद असण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरेदीसाठी गर्दी होणार नाही. एखादे वैश्विक संकट आल्यास आपण घरीच राहून नमाज अदा करू शकतो. इस्लामचा कायदा शरीयतनुसार अशी मुभा देण्यात आलेली आहे. त्यामुळे गर्दी न करता घरी राहूनच नमाज अदा करावी. राज्य शासनाच्या आदेशाचे सर्वजण पालन करून हा आजार दूर घालविण्यासाठी प्रयत्न करतील, अशा विश्वास शहर काझी यांनी व्यक्त केला.  

टॅग्स :SolapurसोलापूरRamadanरमजानMuslimमुस्लीमcorona virusकोरोना वायरस बातम्या