शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनी केली, याच उद्धव ठाकरेंनी...; राज ठाकरेंचा मोठा हल्ला
2
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
3
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
4
"काँग्रेस आणि सपाचा DNA पाकिस्तानसारखा", योगी आदित्यनाथ यांचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
5
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
6
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
7
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
8
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
9
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
10
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
11
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
12
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
13
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
14
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
15
रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video
16
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
17
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
18
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
19
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
20
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'

विद्युत झगमगाटात उजळले सोलापुरातील शहरातील चर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 10:56 AM

कॅरल सिंगिंगद्वारे प्रभू येशू जन्माचे गुणगान; केक वाटून साजरा होणार नाताळ : सर्वांच्या घरी प्रार्थना सभा

ठळक मुद्दे २५ डिसेंबर रोजी सकाळी सर्वच चर्चमध्ये प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात आले सर्वत्र गोड केक वाटून ख्रिसमस साजरा करण्यात येणार आहेरंगभवन येथील दि फर्स्ट चर्चमध्ये आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली

सोलापूर : नाताळ अर्थात ख्रिसमस उत्सव साजरा करण्यासाठी सोलापुरातील ख्रिस्ती बांधवांकडून सर्वत्र लगबग सुरु आहे़ ख्रिस्ती बांधवांच्या घरी कॅरल सिंगिंग कार्यक्रम उत्साहात सुरु आहेत़ कॅरल सिंगिंगद्वारे बांधव प्रभू येशूंचे गुणगान गात आहेत़ तसेच प्रभूंच्या वचनांची तसेच संदेशाचे गायन घरोघरी सुरु आहे़ नाताळाच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यातील सर्वच चर्चमध्ये आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे़ सर्वत्र प्रभू येशूंच्या जन्मसोहळ्याची तयारी सुरु आहे़ सर्वत्र नाताळाची धूम आणि उत्साहाचे वातावरण आहे.

 २५ डिसेंबर रोजी सकाळी सर्वच चर्चमध्ये प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात आले आहे़ सर्वत्र गोड केक वाटून ख्रिसमस साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती दि फर्स्ट चर्च, सोलापूरचे रेव्ह़ विकास रणसिंगे यांनी ‘लोकमत’ला दिली़ रंगभवन येथील दि फर्स्ट चर्चमध्ये आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तसेच रेल्वे लाईन येथील सेंट जोसेफ चर्चमध्ये मंगळवारी रात्री नऊ वाजता प्रभू येशूंचा जन्मसोहळा होणार आहे़ त्याची तयारी सुरु आहे़ सकाळी साडेसात वाजता चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली आहे़ साडेआठ वाजता ख्रिस्ती बांधवांना चर्च फादरद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती चर्चच्या वतीने देण्यात आली आहे.

साकारले ख्रिसमस ट्रीचे चित्र- चर्चच्या भिंतीवर प्रभू येशू, सांताक्लॉज तसेच ख्रिसमस ट्रीचे रंगीत चित्र साकारले आहे़ रंगभवन येथील एपिफणी चर्च, मोदी येथील मेथडीस्ट चर्च, सात रस्ता येथील हिंदुस्तानी चर्च तसेच रेल्वे लाईन येथील सेंट जोसेफ चर्च तसेच सिलोह चर्च यासह इतर चर्चमध्ये प्रभू येशूंच्या जन्मसोहळ्याची तयारी उत्साहात सुरु आहे़ 

दि फर्स्ट चर्च सोलापूरच्या वतीने २५ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता रंगभवन येथील चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना सभा नियोजित आहे़ तसेच साडेदहा वाजता नाताळ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे़ दुपारी साडेबारादरम्यान रॅली सुरु राहील़ रंगभवन येथून रॅली सात रस्ता परिसरात फिरणार आहे़ त्यानंतर पुन्हा रंगभवन येथील दि फर्स्ट चर्च येथे रॅलीचा समारोप होणार आहे़ या रॅलीत प्रभू येशंूचा मेसेज तसेच विश्व शांतता धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यात येणार आहे़ दिवसभर चर्चमध्ये गीतगायन कार्यक्रम सुरु राहील़ चर्चमध्ये येणाºया बांधवांना केक वाटले जाणार आहे़ ९ जानेवारीपर्यंत चर्चमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम नियोजित आहेत़- रेव्ह़ विकास रणसिंगे, दि फर्स्ट चर्च, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरChristmasनाताळ