शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
3
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
4
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
5
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
6
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
7
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
8
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
9
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
10
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
11
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
12
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
13
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
14
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
15
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
16
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
17
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
19
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
20
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार

सोलापूरात पत्नीचा खून करणाºया पतीस जन्मठेप

By appasaheb.dilip.patil | Updated: August 1, 2017 17:51 IST

सोलापूर दि १ : पत्नीचा गळा दाबून खून केल्याच्या गुन्ह्याखाली आरोपी पती प्रभाकर यशवंत कलागते (वय ३५, रा. मजरेवाडी, सोलापूर) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी न्यायालयापुढे आलेले सबळ पुरावे ग्राह्य मानून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १ : पत्नीचा गळा दाबून खून केल्याच्या गुन्ह्याखाली आरोपी पती प्रभाकर यशवंत कलागते (वय ३५, रा. मजरेवाडी, सोलापूर) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी न्यायालयापुढे आलेले सबळ पुरावे ग्राह्य मानून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याशिवाय दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला. शनिवारी या प्रकरणी झालेल्या सुनावणीत या प्रकरणातील सासू-सासºयास सबळ पुराव्याअभावी मुक्त करून मयत सुषमा कलागतेचा पती प्रभाकर यास याला दोषी धरले होते.मयत सुषमाचा (वय २३, रा. मजरेवाडी, सोलापूर) विवाह प्रभाकर यशवंत कलागते याच्याशी १ जून २०१० रोजी झाला होता. विवाहानंतर सुषमास मूल होत नाही म्हणून सासू सुरेखा कलागते, सासरा यशवंत कलागते, पती प्रभाकर कलागते यांच्याकडून छळ होत असे. या काळात सुषमाला प्रतीक्षा नावाची मुलगी देखील झाली होती. यावरही आरोपींचा छळ सुरूच होता. ७ आॅक्टोबर २०१३ रोजी यातील आरोपींनी सुषमाशी भांडण करून तिचा गळा दाबून खून केला, अशा आशयाची फिर्याद मयताची आई राजश्री अरुण निस्ताने हिने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता पोलिसांनी आरोपींविरुद्ध भा.दं. वि. ३०७, ३०२ सह ३४ अन्वये गुन्हा नोंदला होता.---------------सरकार पक्षाचा युक्तिवादया खटल्यात सरकार पक्षाकडून अ‍ॅड. प्रदीपसिंग राजपूत यांनी तर आरोपीकडून अ‍ॅड. प्रशांत देशमुख यांनी काम पाहिले.या खटल्यात सरकारतर्फे ११ साक्षीदार तपासले. सरकार पक्षाने युक्तिवादात मयत सुषमा ही आरोपींच्या ताब्यात असताना मयत झाल्याने व उपलब्ध वैद्यकीय पुरावा आणि पंचनामा, परिस्थितीजन्य पुरावा, वैद्यकीय अधिकाºयांची साक्ष या बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. आरोपी प्रभाकर कलागते हा खुनाच्या आरोपाखाली दोषी असल्याने त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. न्यायालयाने सुनावणीत न्यायालयापुढे आलेल्या साक्षीपुराव्याच्या आधारे आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर मयताची सासू सुरेखा व सासरा यशवंत कलागते यांना सबळ पुराव्याअभावी निर्दोष सोडले.----------------दंडाची रक्कम प्रतीक्षाला देण्याचा आदेशआरोपी असलेल्या प्रभाकर कलागते याने पत्नीचा खून केल्याने त्यांना असलेली लहान मुलगी प्रतीक्षा आई मयत झाल्याने आणि पिता शिक्षेस पात्र ठरल्याने अनाथ झाली आहे. तिच्या पालनपोषणाच्या दृष्टीने पाच लाख रुपयांची मागणी सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीपसिंग राजपूत यांनी केली. न्यायालयाने याची दखल घेत आरोपीला दोन लाख रुपयांचा दंड सुनावला. संबंधित रक्कम प्रतीक्षास देण्याचा आदेश दिला. तोपर्यंत संबंधित रक्कम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे ठेवण्याचे निर्देश निकालाद्वारे न्यायालयाने दिले.