शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
5
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
6
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
7
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
8
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
9
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
10
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
11
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
12
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
13
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
14
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
15
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
16
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
17
पाशांकुश एकादशीला 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; काय घ्यावी काळजी? वाचा!
18
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
19
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
20
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!

विधानपरिषदेत लक्षवेधी, सोलापूर महापालिकेत धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 12:37 IST

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या होटगी रस्त्यांवरील बेकायदेशीर बंगल्याबाबत विरोधकांनी लक्षवेधी

ठळक मुद्देसहकार मंत्र्यांचा बंगला बेकायदेशीर सहकार मंत्र्यांनी पदाचा दुरूपयोग केल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी नगरअभियंता कार्यालयात धावपळ उडाली

सोलापूर : सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या होटगी रस्त्यावरील बंगल्याबाबत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी लक्षवेधी केली आहे. त्यामुळे शासनाकडून या बंगल्याबाबत  माहिती मागविल्यामुळे महापालिकेत धावपळ सुरू असल्याचे दिसून आले.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांच्याबरोबरच विधानपरिषदेचे सदस्य संजय दत्त, शरद रणपिसे, अशोक जगताप, हुस्नबानू खलिफे, अनिकेत तटकरे, सुनील तटकरे, हेमंत टकले, अमरसिंह पंडित, संदीप चव्हाण, किरण पावस्कर, अ‍ॅड. राहुल नार्वेकर व इतर सदस्यांनीही या प्रश्नावर लक्षवेधी केली आहे.

सहकार मंत्र्यांनी अग्निशामक दलास आरक्षित असलेली जागा खरेदी करून बांधलेल्या अलिशान बंगल्याचा बांधकाम परवाना बेकायदेशीर असल्याचा अहवाल महापालिका आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयात दिला आहे. यामुळे सहकार मंत्र्यांचा बंगला बेकायदेशीर असल्याचे उजेडात आले आहे. ही बाब गंभीर आहे. बंगल्याची जागा गुंठेवारीची असून, त्यावर अद्याप आरक्षण आहे. गुंठेवारी जागेवर बांधकाम परवाना देण्याची तरतूद नसताना महापालिकेच्या तत्कालीन अधिकाºयांनी असा परवाना दिला. यापुढे जाऊन बांधकाम परवाना रिवाईज करण्याचा अर्ज आलेला नसताना महापालिकेच्या अधिकाºयांनी हा परवाना रिवाईज केला. हा प्रकार उघडकीस आल्यावर हे बांधकाम त्वरित निष्कासित का केले नाही. सहकार मंत्र्यांनी पदाचा दुरूपयोग केल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. तरीही शासनाने या प्रकाराकडे  का दुर्लक्ष केले, असा सवाल लक्षवेधीद्वारे करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी नगरअभियंता कार्यालयात धावपळ उडाली आहे.

बसथांबा गेला कुठेच्विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी मांडलेल्या लक्षवेधीमध्ये सहकार मंत्र्यांच्या बंगल्याबरोबर इतर दहा जागांबाबतची माहिती विचारली आहे. सहकार मंत्र्यांच्या बंगल्यासमोर बसथांबा होता. बंगला बांधल्यावर हा बसथांबा व रस्ते विकास महामंडळाने बांधलेला पदपाथ कोणी हडप केला, असा सवाल उपस्थित केला आहे. लक्षवेधीच्या अनुषंगाने सर्व कागदपत्रे जमा करण्यात येत आहेत. या फायली ६ जुलैपर्यंत नागपूरला रवाना करण्यात येणार आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका