शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर स्मार्ट सिटीमधील एलईडीचा बेसलाईन सर्व्हे सुरू, लवकरच बल्बही बसविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 12:32 IST

सोलापूर :  शहरातील पथदिव्यांवर एलईडी दिवे बसविण्यासाठी ईईएसएल कंपनीने बेसलाईन सर्व्हे सुरू केला आहे. बुधवारी संभाजी चौक ते शिवाजी ...

ठळक मुद्देमहापालिकेच्या आवारातच नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणारएलईडी दिवे बसविल्यानंतर महापालिकेच्या वीज बिलात ४० टक्के बचत होणार

सोलापूर :  शहरातील पथदिव्यांवर एलईडी दिवे बसविण्यासाठी ईईएसएल कंपनीने बेसलाईन सर्व्हे सुरू केला आहे. बुधवारी संभाजी चौक ते शिवाजी चौक यादरम्यानच्या पथदिव्यांवर नोंदी करण्यात आल्या. सर्वेक्षणाचे काम जसजसे पूर्ण होईल. त्या पाठोपाठ एलईडी दिवे बसविण्याचे काम सुरू होईल, अशी माहिती मनपाच्या विद्युत विभागाचे सहायक अभियंता राजेश परदेशी यांनी दिली. 

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत महापालिकेने अनेक स्मार्ट कामे सुरू केली आहेत. यामध्ये पथदिव्यांवरील जुने दिवे बदलून एलईडी दिवे बसविण्यासाठी  महापालिका आणि ईईएसएल कंपनीमध्ये नुकताच करार झाला आहे. त्यानुसार ईईएसएल कंपनीने सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. पहिल्या दिवशी संभाजी चौक ते शिवाजी यादरम्यानच्या पथदिव्यांवर  नोंदी करण्यात आल्या. रस्त्याची रुंदी, पोलची उंची, वाहतुकीचे प्रमाण आदी माहितीची नोंद करण्यात आली.  यानुसार शहरातील सर्वच पथदिव्यांच्या नोंदी  केल्या जातील.

 महापालिकेच्या विद्युत विभागातील कर्मचाºयांनी अधिकारी आणि पदाधिकाºयांच्या सूचनेनुसार पथदिव्यांवर वेगवेगळ््या वॅटचे दिवे बसविले आहेत; मात्र ईईएसएल कंपनी नॅशनल लायटनिंग कोडनुसार निश्चित झालेल्या वॅटचे एलईडी दिवे बसविणार आहे. महापालिकेच्या आवारातच नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. एलईडी दिवे बसविल्यानंतर महापालिकेच्या वीज बिलात ४० टक्के बचत होणार आहे. ज्या भागातील सर्वेक्षण पूर्ण होईल, त्या भागातील पथदिव्यांवर एलईडी बसविण्याचे काम सुरू होईल. येत्या सहा महिन्यात संपूर्ण शहरातील पथदिव्यांवर एलईडी बसविण्याचे काम पूर्ण होईल, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. 

कक्ष स्थापन होणार- महापालिकेच्या आवारातच नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. एलईडी दिवे बसविल्यानंतर महापालिकेच्या वीज बिलात ४० टक्के बचत होणार असल्याची माहिती परदेशी यांनी दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाSmart Cityस्मार्ट सिटी