शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जाणून घ्या; घरच्या घरी गणपती विसर्जनाचा हा आहे सोपा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 13:20 IST

सोलापूर लोकमत विशेष...

ठळक मुद्देगणेशमूर्तीचे घरीच विसर्जन करताना त्यात खाण्याचा सोडा वापरावाहा प्रयोग पुणे महापालिकेने यशस्वी करून दाखविला आहेतलावात न जाता घरीच भक्तिमय वातावरणात गणेश विसर्जन करता येते

शीतलकुमार कांबळे

सोलापूर : गणेश विसर्जन काहीच दिवसांवर आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तलावात विसर्जन करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे घरीच विसर्जन करावे लागणार आहे. शाडूची मूर्ती असेल तर काही अडचण नाही. मात्र, मूर्ती प्लॅस्टर आॅफ पॅरिसची असेल तर लवकर विरघळणार नाही. यामुळे विसर्जन करताना खाण्याचा सोडा पाण्यात वापरला तर मूर्ती लवकर विरघळेल, असे तजज्ञांनी सांगितले.

प्लॅस्टर आॅफ पॅरिसची मूर्ती खाण्याचा सोडा घातलेल्या पाण्यात ठेवावी. ७२ ते ९६ तासांमध्ये मूर्ती विरघळते. त्यापासून प्लॅस्टर आॅफ पॅरिस, गवत, रंग व अन्य घटक सुटे होतात. मूर्ती विरघळल्यानंतर भांड्यातील पाण्याचे अमोनियम सल्फेटमध्ये, तर पीओपीचे कॅल्शियम कार्बोनेटमध्ये रूपांतर होते. हे पाणी झाडांना खत म्हणून वापरता येते.

यंदाच्या वर्षी जनजागृती झाल्याने सोलापूरकरांनी शाडूच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्तीस पसंती दिली. २० हजारांहून अधिक जणांनी शाडूची मूर्ती खरेदी केली, अनेकांना शाडूची मूर्ती मिळाली नाही. त्यामुळे अशा भाविकांनी प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीची खरेदी केली. या मूर्ती पाण्यात लवकर विरघळत नाहीत. यामुळे विसर्जन करताना पाण्यात खाण्याचा सोडा घालण्याचा पर्याय चांगला असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

मूर्तीच्या वजनाइतका वापरावा खाण्याचा सोडाश्री गणेशमूर्ती पूर्ण सामावू शकेल, अशी बादली प्रथम घ्यायला हवी. त्यात पुरेसे पाणी ओतावे. जितके वजन मूर्तीचे आहे, तितक्याच वजनाचा खाण्याचा सोडा बादलीमध्ये टाकावा. एका काठीने मिश्रण ढवळावे. सोडा पाण्यामध्ये विरघळल्यानंतर त्यात गणेशमूर्ती ठेवावी. त्यानंतर दर दोन तासांनंतर बादलीमध्ये काठीने ढवळावे. साधारणपणे ७२ ते ९६ तासांमध्ये मूर्ती पूर्णपणे विरघळते. मूर्ती विरघळल्यानंतर त्याचा खत म्हणून वापर करता येऊ शकतो.

गणेशमूर्तीचे घरीच विसर्जन करताना त्यात खाण्याचा सोडा वापरावा. हा प्रयोग पुणे महापालिकेने यशस्वी करून दाखविला आहे. यामुळे तलावात न जाता घरीच भक्तिमय वातावरणात गणेश विसर्जन करता येते. विसर्जन केल्यानंतर त्याचा वापर आपल्या बागेमध्ये खत म्हणून करता येतो.- डॉ. निनाद शहा, पर्यावरण अभ्यासक.

टॅग्स :SolapurसोलापूरGanesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८