शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

हल्ल्याच्या निषेधार्थ न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहून वकीलांनी केला निषेध

By संताजी शिंदे | Updated: February 13, 2024 19:18 IST

हल्ला प्रकरणी चौघांविरूद्ध भादवी कलम ३२७, ४२७, ५०४, ५०६ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बार्शी: पंढरपूर येथील वकील संघाचे सदस्य ॲड. पंकज हातगिने (रा.जैनवाडी ता.पंढरपूर) यांची गाडी आडवून, शिवीगाळ करीत त्यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी बार्शी वकील संघाच्या वतीने न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहून निषेध केला. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी पक्षकाराने त्यांची गाडी अडवून ॲड. पंकज हातगिने यांच्यावर हल्ला केला. त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली.

या घटनेनंतर पंढरपूर अधिवक्ता संघाचे पदाधिकारी व अनेक सदस्यांनी ग्रामीण पोलिस स्टेशन, पंढरपूर धाव घेतली. त्या नंतर चार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला व त्यांच्या अटकेची मागणी केली. या घटनेमुळे वकीलावरील अन्याय, हत्या अत्याचार, प्राणघातक हल्ले यास प्रतिबंध करण्यासाठी ॲडव्होकेट  प्रोटेक्शन बिल मंजूर होणे गरजेचे असल्याची मागणी बार्शी वकील संघाचे अध्यक्ष काकासाहेब गुंड यांनी तातडीच्या बैठकीत केली. हल्ल्याचा निषेध नोंदवून मंगळवारी न्यायालयीन कामापासून अलिप्त राहण्याचा निर्णय जाहीर केला.

हल्ला प्रकरणी चौघांविरूद्ध भादवी कलम ३२७, ४२७, ५०४, ५०६ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या घटने बाबत योग्य तो विचार विनिमय करून निर्णय घेण्यात येणार आहे. तरी पंढरपूर अधिवक्ता संघातील सर्व सदस्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर