शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

युवा महोत्सवात भजन, भारुड, पोवाडा, कव्वालीबरोबर लावणीही रंगणार; सहा भारतीय लोककलांचा समावेश!

By संताजी शिंदे | Updated: September 14, 2023 19:05 IST

युवा महोत्सवामध्ये भारतीय लोककला प्रकारांचा समावेश करण्याची मागणी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य राजाभाऊ सरवदे, दलित पॅंथर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आतिश बनसोडे यांनी के

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या यंदाच्या १९ व्या युवा महोत्सवात,  सहा नवीन भारतीय लोककलांचा समावेश करण्यात आल्याची घोषणा प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी केली. यामध्ये भजन, भारुड, पोवाडा, शाहिरी जलसा, कव्वाली आणि लावणी या लोककला प्रकारांचा समावेश आहे. 

युवा महोत्सवामध्ये भारतीय लोककला प्रकारांचा समावेश करण्याची मागणी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य राजाभाऊ सरवदे, दलित पॅंथर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आतिश बनसोडे यांनी केली होती. या अनुषंगाने गुरुवारी प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी युवा महोत्सवात समावेश असलेल्या विविध कला प्रकारांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणात समाविष्ट असलेल्या विविध बाबींचा विचार करून भारतीय लोककला व संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी नव्याने भजन, भारुड, पोवाडा, शाहिरी जलसा, कव्वाली आणि लावणी या कलाप्रकारांचा समावेश करण्याची घोषणा केली. यातील काही कलाप्रकार युवा महोत्सवात होते, मात्र मागील सहा वर्षांपासून युवा महोत्सवातून वगळण्यात आले होते. त्यामुळे आता युवा महोत्सवात कला प्रकारांची संख्या वाढली आहे.

युवा महोत्सवात ३९ कलाप्रकार

  • यंदाचा युवा महोत्सव हा दि. १० ते १३ ऑक्टोबर २०२३ दरम्यान पंढरपूर येथील श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालय (स्वेरी कॉलेज) येथे रंगणार आहे. 
  • संलग्नित महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी युवा महोत्सवाची तयारी सुरू केली आहे. आता नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या या नवीन सहा कला प्रकारामुळे संख्या ३९ वर गेली आहे. नवीन कला प्रकारांची तयारीही विद्यार्थ्यांनी करावी, असे आवाहन प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी केले आहे.
टॅग्स :Solapurसोलापूर