शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील 'वीरगळ' मोजताहेत शेवटच्या घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 11:00 IST

इतिहासाची साक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर, इतिहास सांगणारे वीरगळ आता अबोल होऊ लागलेत

ठळक मुद्देकोरीव लेख व चित्रांचा वापर करून उभारण्यात आलेली शिळा म्हणजे वीरगळचित्रे, मजकूर पुसट होण्याच्या मार्गावर

महेश कोटीवाले  वडवळ: अनेक खेड्यांतून इतिहासकाळातील वैभवाची साक्ष देणाºया अज्ञात वीरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ असलेले ‘वीरगळ’ शेवटच्या घटका मोजत आहेत. ऊन, पाऊस, वारा झेलत पडले असून, भविष्यात हे वीरगळ नामशेष झाल्यास त्यामागील त्या अज्ञात वीरांचा इतिहासदेखील नामशेष होण्याची भीती व्यक्त होत आहे.

मोहोळ तालुक्यातील पीरटाकळी, गोटेवाडी, सावळेश्वर (ही काही प्रातिनिधिक गावे) यासह अनेक गावात असे वीरगळ अनास्थेमुळे दुर्लक्षितच राहिले असून, एकेकाळचा इतिहास सांगणारे हे वीरगळ आता अबोल होऊ लागले आहेत.

अनास्थेमुळे किंवा अंधश्रद्धेमुळे या विरगळांनाच देवदेवता समजून गावातील मंदिराच्या कडेला किंवा इतरत्र ठेवून त्यावर तेल, हळद-कुंकू,अन्य पदार्थ वाहिले जात असून, यामुळे त्यावरील चित्रे, मजकूर पुसट होण्याच्या मार्गावर आहेत.

पीरटाकळी (ता. मोहोळ) येथे सध्या हनुमान मंदिराच्या बाहेर असे चार वीरगळ आहेत. याविषयी माहिती देताना अणवेकर यांनी या गावात वीरमरण आलेल्या पुरुषांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे वीरगळ असून, त्यांच्या मृत्यूनंतर सती गेलेल्या त्यांच्या पत्नीचे प्रतीक म्हणून तिचा हात यावर कोरला असून, तिच्या हातात बांगड्यांचा चुडा आहे. वरील बाजूस सूर्य, चंद्र व शिवलिंग असून, ही सती शिळा असल्याचे सांगितले.

वीरगळ म्हणजे काय?

  • - गावाच्या व समाजाच्या हितासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिलेल्या शूरवीरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोरीव लेख व चित्रांचा वापर करून उभारण्यात आलेली शिळा म्हणजे वीरगळ होय.

वीरगळाचे प्रकार

  • - गोवर्धन शिळा- गोधन रक्षणासाठी ज्याने बलिदान दिले, त्याची स्मृती जपण्यासाठी त्यावर गाई-बैल अशा खिलारी जातीची चित्रे असतात.
  • पालिया वीरगळ- सती शिळा: पतीला वीरमरण आल्यानंतर त्याची पत्नी सती जाण्याची प्रथा होती. प्रेताबरोबर तिचे आत्मदहन, सहगमन केले जायचे. ती सती जाताना तिला पालखीत बसवून नेले जात होते. असे चित्र असते. त्याला पालिया वीरगळ किंवा सती शिळा असे म्हणतात.
  • महात्मा वीरगळ- एखाद्या तपस्वी, साधू महाराजांचे ध्यानस्थ अवस्थेतील शिळा म्हणजे महात्म्यांची वीरगळ. 

 

इतिहास संशोधक आनंद कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचीन शिलालेखांचा अभ्यास सुरु असून, हा प्राचीन इतिहास शिळेच्या स्वरूपात आज असला तरी त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. ग्रामस्थांनी आपल्या मानसिकतेत बदल करून हे सुरक्षित ठिकाणी याचा संग्रह केल्यास अनेक वर्षे हा इतिहास टिकणार आहे. हा अनमोल ठेवा आहे, जो पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल.-नितीन अणवेकर,सोलापूर इंटॅक सदस्य---------------एखादा विषय आज घेतला आणि उद्या लगेच मार्गी लागेल, असे होत नसते. प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते. यासाठी प्रत्येकाला याची गरज वाटून त्या दृष्टीने चिकाटीने सकारात्मक राहून पाठपुरावा करणे गरजेचे आहे. विषय लावून धरणे व त्यासाठी सतत पाठपुरावा करणे हाच पर्याय आहे.-सुभाष देशमुख,सहकारमंत्री

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखhistoryइतिहास