शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

१.७१ लाखांची फसवणुक करणाऱ्या सोलापूरच्या कुमार करजगीला दोन दिवसाची पोलीस कोठडी

By admin | Updated: March 24, 2017 14:47 IST

१.७१ लाखांची फसवणुक करणाऱ्या सोलापूरच्या कुमार करजगीला दोन दिवसाची पोलीस कोठडी

१.७१ लाखांची फसवणुक करणाऱ्या सोलापूरच्या कुमार करजगीला दोन दिवसाची पोलीस कोठडी सोलापूर: जुनी मिल जागेच्या फसवणूक प्रकरणात उद्योजक कुमार करजगी यांना अटक केल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांची शासकीय रुग्णालयात रात्री साडेनऊच्या सुमारास वैद्यकीय तपासणी करण्यात आली. करजगी यांनी विश्वासघात करुन १ लाख ७१ हजार ७५० रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार आहे. शुक्रवारी जिल्हा न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली़जुनी मिल कापड गिरणी आशिया खंडातील सोलापूरस्थित सर्वात मोठी कापड गिरणी होती. हजारो कामगार या गिरणीत काम करीत होते. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कोर्ट रिसिव्हरने जुनी मिलचे साहित्य विक्रीला काढून देणेकऱ्यांचे काही देणे दिले. उर्वरित देणी देण्यासाठी मिलकडे फक्त मोकळी जमीन राहिल्याने कोर्ट रिसिव्हरने १९८८ साली सर्व जमीन सहा लॉटमध्ये लिलावाद्वारे विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यात जुनी मिल कंपाऊंड (६५ एकर), मोतीबाग आवार, सिव्हिल लाईन्स (१५ एकर), हिरज रोडवरील शेतजमीन (३७ एकर), रेल्वे लाईनजवळील शेतजमीन (१५ एकर), धरमसी लाईन (३ एकर) आणि जुनी पोलीस लाईन चाळ या जागांचा समावेश आहे.कुमार करजगी यांनी जुनी मिल बेकार कामगार व अर्जदार आणि जनहित संघर्ष समिती या नावाने संस्था स्थापन केली. तेथील जागा २० रुपये प्रतिचौरस फुटास २० हजार रुपये याप्रमाणे युनो बँकेत संस्थेच्या खात्यावर २ कोटी ५३ लाख ७७ हजार रुपये भरले. या जागेच्या संदर्भात उच्च न्यायालयातील बोली मान्य झाल्यानंतर लिलावात रक्कम वाढल्याचे सांगून प्रत्येक सभासदाकडून जादा १० हजार रुपये संघर्ष समितीच्या खात्यावर जमा करण्यास सांगितले. या दरम्यान कुमार करजगी यांनी स्वत:च्या मुलाच्या नावावर के. के. असोसिएटस् नावाची संस्था स्थापन करून या संस्थेद्वारे जुनी मिल परिसराचा विकास व सभासदांना घरे बांधून घेण्यासाठी सक्ती केली. पुन्हा सभासदांकडून २५ हजार रुपये प्रति प्लॉटप्रमाणे घेतले. त्यानंतर आजतागायत करजगी यांच्याकडून जागेचा प्रत्यक्ष ताबा मिळाला नाही. आम्हा सभासदांचा विश्वासघात करुन १,७१,७५० रुपयांची फसवणूक केली, अशा आशयाची तक्रार अजितकुमार देशपांडे यांनी पोलिसांकडे केली आहे.