श्रीपूर (ता. माळशिरस) येथील पांडुरंग कारखाना येथे चेअरमन आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना पश्चात होणारे आजार व त्यावरील उपचार या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, संचालक बाळासाहेब यलमार उपस्थित होते. यावेळी डॉ. इनामदार म्हणाले, मागील दीड वर्षांपासून कोविड पेशंट तपासत असताना अनेक अनुभव आले. यामध्ये एखाद्या व्यक्तीला कोविडची कोणतीही लक्षणे दिसत नसतील, परंतु त्याला कोविड झालेला असतो व तो कोविड त्या व्यक्तीला आतून पोखरत असतो. कोविडमुळे होणारे परिणाम हे दीर्घ स्वरुपाचे असतात. यामधील व्यक्तीला ऑक्सिजनची कमतरता भासते तसेच इतरही समस्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे कोविड झालेल्या व्यक्तीला नंतरच्या काळातही अत्यंत काळजी घेणे गरजेचे असते. यावेळी डॉ. इनामदार यांनी वैद्यकीय क्षेत्रात आलेल्या अनेक अनुभवांचे कथन केले. वयोवृद्ध व्यक्तींबरोबरच ब्लडप्रेशर, शुगर व इतर आजार असणाऱ्या व्यक्तींनीही लसीकरण करून घेणे आवश्यक असल्याचे नमूद केले. यावेळी आर. बी. पाटील, एम. आर .कुलकर्णी, रवींद्र काकडे, रमेश गाजरे, हणमंत नागणे, समीर सय्यद, टी. एस. भोसले, एस. एन. कदम, बी. एस. बाबर आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन डॉ.सुधीर पोफळे यांनी केले. तसेच आभार डॉ. प्रमोद पवार यांनी मानले.
..............
फोटो ओळी : श्रीपूर येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी डॉ. एम. के. इनामदार, डॉ. यशवंत कुलकर्णी, बाळासाहेब यलमार, डॉ. सुधीर पोफळे आदी.
(फोटो ३१श्रीपूर कारखाना)