शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपुरातील एका परिसरातच आठ व्यक्तींना कोरानाची लागण; महापौर चाळ केली सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 09:25 IST

५० वयोवृद्धांचे आज होणार रॅपिड अँटीजेन टेस्ट; कोरोना मुक्तीसाठी आरोग्य विभागाचे शर्तीचे प्रयत्न सुरूच

पंढरपूर :  एका कुटुंबातील ५ तर दुसऱ्या कुटुंबातील ३ असे एकूण ८ रुग्ण शहरातील महापौर चाळ येथे सापडले आहेत. त्यामुळे हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. त्याचबरोबर पंढरपूर - कुर्डवाडी रोडवरील एका गावच्या सरपंचाला ही कोणाची लागण झाली आहे.

एकाच कुटुंबातील ज्यादा व्यक्तींना कोरानाची लागण झाल्याची माहिती मिळताच प्रांताधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, गट विकास अधिकारी रविकिरण घोडके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, डॉ. धनंजय सरोदे, उपमुख्यधिकारी सुनील वाळुजकर, आरोग्य निरीक्षक शरद वाघमारे यांनी महापौर चाळ या ठिकाणी भेट दिली. त्या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक यांना या परिसरातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी दक्ष राहण्यास सांगितले. सर्वांनी घरात राहून आवश्यक असणारे साहित्य कोविड वॉरियर्स माध्यमातून मागून घ्यावे मागून घ्यावे अशा सूचना दिल्या.

तसेच प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी नगरपालिका प्रशासनाने महापौर चाळ परिसर सर्व बाजूने सील करावा. तसेच या परिसरातील वयोवृद्ध लोकांचे विलगीकरण करा. त्यांना एका विशिष्ट ठिकाणी संस्थात्मक विलगीकरण करा अशा सूचना दिल्या.

वयोवृद्धांचे आज  रॅपिड अँटीजेन टेस्ट

महापौर चाळ परिसरातील वयोवृद्ध लोकांची माहिती संकलित करण्यात येणार आहे. या सर्व वयोवृद्ध लोकांना विलगीकरण करण्यात येणार आहे.  त्याचबरोबर त्या सर्व लोकांची रॅपिड अँटीजेन टेस्ट एकाच दिवशी होणार आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या