शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरी वारकऱ्यांचं गुरुवारी रायगडावर किर्तन; दोन दिंड्यासोबत स्केटींगवरून शिवज्योतही!

By रवींद्र देशमुख | Updated: May 29, 2023 15:03 IST

रायगडावर 1674 साली राज्यभिषेक झाला त्यावेळी गडावर गायन - वादन , संत पूजन मोठ्या प्रमाणात झाले आहे, याची इतिहास साक्ष देत आहे.

        सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा रायगड येथे साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने 1 जून रोजी सोलापूरचे ह. भ. प. सुधाकर महाराज इंगळे यांचे कीर्तन होणार आहे, ही माहिती रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक शिवाजी भोसले यांनी दिली. 

बुधवार दि.31 मे रोजी दु 12.00 वा. दोन वाहने संत मुक्ताई मंदिर येथून रायगडकडे रवाना होणार आहेत. शिवप्रेमी रोल स्केटिंगद्वारे मंगळवारी शिवज्योत तुळजापूर - सोलापूर ते रायगड राज्यभिषेक सोहळ्यासाठी घेऊन जाणार आहेत. तर गुरुवार दि.1 जून रोजी सायंकाळी 6.00 वा अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.सुधाकर महाराज इंगळे यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे.

शुक्रवार दि.2 जुन रोजी सकाळी 7.30 वा. रायगडावरील जगदीश्‍वराच्या मंदिराकडे पालखी निघते त्यावेळी भव्य आणि दिव्य वारकरी दिंडी निघणार आहे. या दिंडी मध्ये वारकरी परंपरे प्रमाणे विविध पाऊल, फुगडी, वगैरे सादर केले जाणार आहे. ही दिंडी ज्योतीराम चांगभले (प्रदेश अध्यक्ष) व ह भ प बळीराम जांभळे (राष्ट्रीय सचिव ) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे.    

छत्रपती शिवाजी महाराजांनी संत तुकाराम महाराज यांचे अनेक वेळा कीर्तन श्रवण केले आहे. संत तुकाराम महाराज यांचे विचार घेऊन राज्यभिषेक सोहळ्यास आम्ही जात आहोत, असे इंगळे महाराज यांनी सांगितले.

रायगडावर 1674 साली राज्यभिषेक झाला त्यावेळी गडावर गायन - वादन , संत पूजन मोठ्या प्रमाणात झाले आहे, याची इतिहास साक्ष देत आहे. त्यामुळे यंदा कीर्तन व वारकरी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याला खूपच महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण मुख्य राज्याभिषेक होऊन 350 वर्ष झाले आहेत. त्यानंतर आता प्रथमच हा योग प्राप्त होत असल्याने ऐतीहासिक महत्त्व प्राप्त होत आहे.

 जे वारकरी रायगडावर जाणार आहेत त्यांचेकडे वारकरी पोशाख असणे गरजेचे आहे. ज्यांना या कार्यक्रमाला उपस्थित रहावयाचे आहे, त्यांनी एक जून रोजी उपस्थित रहावे, असे आवाहन रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक शिवाजीभोसले व विठ्ठल मोलाणे यांनी केले आहे. 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजRaigadरायगडShivrajyabhishekशिवराज्याभिषेक