शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

सोलापूर शहरातील रस्त्यांवर पडले खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 12:45 IST

रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारक, शाळकरी मुले व वृद्धांना यातून मार्ग काढणे जिकिरीचे होऊन बसले आहे

ठळक मुद्दे संततधार पावसाने शहरातील रस्त्यांची चाळण नगरोत्थानमधून झालेल्या चांगल्या रस्त्यांची वाट लागली सोसायटींच्या रस्त्यांसाठी मुरुम देण्याचे बंद

सोलापूर : गेले चार दिवस सोलापुरात सुरू असलेल्या संततधार पावसाने शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारक, शाळकरी मुले व वृद्धांना यातून मार्ग काढणे जिकिरीचे होऊन बसले आहे. 

शहरात गेल्या चार दिवसांपासून संततधार सुरू आहे. पावसाची रिपरिप सुरू झाल्यावर नव्याने करण्यात येणाºया रस्त्यांची कामे थांबविण्यात आली आहेत. पूर्वीच्या जुन्या रस्त्यावर पडलेले खड्डे पावसाने मोठी झाली आहेत. खड्ड्यात पाणी साचून राहत असल्याने अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यांची चाळण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. जुळे सोलापूर, होटगी रोड, विजापूर रोड परिसरात ड्रेनेज जोडणीमुळे रस्त्यावर पडलेले खड्डे आणखी मोठे झाले आहेत. ड्रेनेज जोडणीसाठी खोदलेल्या खड्ड्यांबाबत महापालिकेने पैसे घेतले पण खड्डे बुजविलेच नाहीत. याचा मोठा फटका वाहनधारकांना बसत आहे. नगरोत्थानमधून झालेल्या चांगल्या रस्त्यांची वाट लागली आहे. नई जिंदगी, विडी घरकूल, शेळगी, बाळे व हद्दवाढ भागातील नव्याने झालेल्या वसाहतींना जोडणारे रस्ते चिखलमय झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. सोसायटींच्या रस्त्यांसाठी मुरुम देण्याचे बंद झाले आहे. यामुळे पायी व चालत जाणाºया नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. उर्वरित हद्दवाढ भागासाठी नव्याने ड्रेनेज योजना मंजूर झाली आहे. त्यामुळे हे काम होईपर्यंत रस्त्यांची कामे बंद करण्यात आली आहेत. पण प्रत्यक्षात अद्याप कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही. सिव्हिल हॉस्पिटल ते मौलाली चौक, बेडरपूल, पोटफाडी चौक ते कोंतम चौक, आयएमएस स्कूल ते सैफुल, विजापूर रोड, होटगी रोड, भैय्या चौक या मार्गावर खड्डे पडले आहेत. 

रस्त्याच्या खड्ड्यात गप्पी मासे...- डेंग्यू, मलेरियाच्या डासमुक्तीसाठी पावसाने साठलेल्या पाण्याच्या डबक्यात गप्पी मासे सोडण्याची मलेरिया विभागाची मोहीम आहे. पण रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्याकडे लक्ष वेधण्यासाठी नगरसेविका फिरदोस पटेल यांनी खड्ड्यातील पाण्यात गप्पी मासे सोडले. खड्डे बुजविण्यासाठी निधी मिळत नाही. नागरिक समस्यांमुळे बेहाल झाल्याचा त्यांनी आरोप केला. या आंदोलनात शौकत पठाण, मुमताज गौर, उषा कसबे, शेहनाज शेख, मेहराज मुल्ला, परवीन शेख व शाळकरी मुले सहभागी झाले. रस्त्यावर चिखल साठला असून, खड्डे चुकविणाºया वाहनांमुळे नागरिकांना त्रास होत आहे. भरधाव वाहने अशा खड्ड्यात आदळून शाळकरी मुलांच्या अंगावर घाण उडत आहे.

पावसामुळे नवीन रस्त्यांची कामे बंद ठेवली आहेत. खड्डे बुजवण्यासाठी मुरूमाचा वापर केला जाईल. पाऊस थांबल्यानंतर प्रिमिक्सद्वारे खड्डे बुजवले जातील. -संदीप कारंजे, प्रभारी नगर अभियंता. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाroad safetyरस्ते सुरक्षा