शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवाल यांनी शरद पवारांबद्दल असे शब्द वापरले होते, ते मी बोलू शकत नाही! : देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 18:21 IST

नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेचा विश्वास आहे, ते आता वैश्विक नेते झाले आहेत, फडणवीस यांचं वक्तव्य.

सोलापूर : अरविंद केजरीवाल यांनी यापूर्वी शरद पवार यांच्या बद्दल असे असे शब्द वापरले होते, ते मी माझ्या तोंडून बोलू शकत नाही. उद्धव ठाकरे यांच्या बद्दलही वक्तव्य केले होते. केवळ नरेंद्र मोदी यांना विरोध म्हणून ही मंडळी आता एक येत आहे. मात्र नरेंद्र मोदी यांच्यावर लोकांचा विश्वास असून, ते आता वैश्विक नेते झाले आहेत असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरूवारी सोलापूरच्या दौऱ्यावर आले असता, नुतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शरद पवार यांचीही ते भेट घेत आहेत, असे असले तरी हा सर्व प्रपंच नरेंद्र मोदी यांना विरोध करण्यासाठी सुरू आहे. एकेकाळी याच अरविंद केजरीवाल यांनी शरद पवारांबद्दल असे शब्द वापरले होते की ते मी बोलू शकत नाही. उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी टिका केली होती. तेव्हांचे व्हिडीओ आता व्हायरल होत आहेत. मात्र काही झाल तर नरेंद्र मोदी यांच्यावर लोकांचा विश्वास आहे.

नरेंद्र मोदी हे जेव्हां पापुवा न्यू गीनी, फिजी या देशात गेले होते तेव्हां तेथील सरकारने त्यांना सर्वोच्च सन्मानाने गौरव केला आहे. आफ्रीकेच्या पंतप्रधानांनी त्यांना बॉस म्हणून गौरवीले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी तुमचा कार्यक्रम घ्यायचा म्हंटले की कोणा कोणाला पास द्यायचा असा प्रश्न आम्हाला पडतो. जपाननेही अशाचा भावना व्यक्त केल्या होत्या. एकंदरीत परदेशांमध्ये नरेंद्र मोदींची लोकप्रियता वाढली आहे. ते वैश्वीक नेते झाले आहेत, जगासमोर भरताची प्रतीमा वेगळी झाली आहे असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

टॅग्स :MumbaiमुंबईDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसArvind Kejriwalअरविंद केजरीवाल