शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

कार्तिकी यात्रा सोहळा !! दिंडी चालली चालली़़़ विठ्ठलाच्या दर्शनाला़़़दिंड्या आल्या पंढरपूर समीप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 11:30 IST

डोक्याला पागोटा बांधलेला़़़ लुंगी गुंडाळून त्याचा गुडघ्यापासून खोचा खवलेला़़़ कपाळी टिळा, अष्टगंध अन् बुका लावूऩ़़ हातात भगवी पताका घेऊऩ़़ टाळ-मृदंगाचा गजर अन् मुखी हरिनामाचा जयघोष करीत अनेक दिंड्या पंढरीच्या दिशेने झपाझप पावले टाकत कार्तिकी यात्रेनिमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी येत आहेत़  हे चित्र पाहून ‘दिंडी चालली चालली़़़ विठ्ठलाच्या दर्शनाला़़़’ या भक्तिगीताची आठवण झाल्याशिवाय राहत नाही़

ठळक मुद्देसावळ्या पांडुरंगाच्या भेटीची आस घेऊन हा भक्तांचा मेळा पायी प्रवास करीत पंढरीकडे कार्तिकी यात्रेला पंढरपुरात जनावरांचा मोठा बाजार भरतो़समाजसेवी संस्थेच्या वतीने या भाविकांसाठी चहा, नाश्ता व पाण्याची सोय

प्रभू पुजारीपंढरपूर : डोक्याला पागोटा बांधलेला़़़ लुंगी गुंडाळून त्याचा गुडघ्यापासून खोचा खवलेला़़़ कपाळी टिळा, अष्टगंध अन् बुका लावूऩ़़ हातात भगवी पताका घेऊऩ़़ टाळ-मृदंगाचा गजर अन् मुखी हरिनामाचा जयघोष करीत अनेक दिंड्या पंढरीच्या दिशेने झपाझप पावले टाकत कार्तिकी यात्रेनिमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी येत आहेत़  हे चित्र पाहून ‘दिंडी चालली चालली़़़ विठ्ठलाच्या दर्शनाला़़़’ या भक्तिगीताची आठवण झाल्याशिवाय राहत नाही़कार्तिकी यात्रा सोहळ्यासाठी पंढरीच्या सावळ्या पांडुरंगाच्या भेटीची आस घेऊन हा भक्तांचा मेळा पायी प्रवास करीत पंढरीकडे मंगळवेढा, सांगोला, पुणे, सातारा, करकंब, मोहोळ, कराड या मार्गाने येत असल्याचे दिसून येत आहे़ मंगळवेढा मार्गावरून कर्नाटकातील अनेक दिंड्या पंढरीच्या दिशेने येत असल्यामुळे हा रस्ता विठ्ठल भक्तांनी फुलला आहे़ कन्नड भाविक ‘कानडा विठ्ठलू’ च्या दर्शनासाठी येत आहेत़ या मार्गावर सगळीकडे भक्तीचा गजर सुरू आहे़ यंदा सर्वत्र पाऊस झाल्यामुळे पंढरीकडे येणाºया भाविकांच्या संख्येत गतवर्षीच्या तुलनेने वाढ झाल्याचे दिसून येत आहे़ मंगळवेढा रस्त्यावर ठिकठिकाणी झाडाखाली विसावा घेऊन भाविक भोजन घेताना दिसून येत आहेत़ शिवाय काही ठिकाणी समाजसेवी संस्थेच्या वतीने या भाविकांसाठी चहा, नाश्ता व पाण्याची सोय केली आहे़ पुणे, करकंब, मोहोळ मार्गावरून एकामागून एक दिंड्या येत असल्याचे चित्र आहे़ परिणामी सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण होऊन जिकडे तिकडे ‘माऊली़़़ माऊली़़़’ हा शब्द कानी पडत आहे़ भाविक जरी पायी चालत येत असले तरी त्यांना कार्तिक वारी संपेपर्यंत लागणाºया सरपणासह (जळण) सर्व साहित्य सजविलेल्या ट्रक, ट्रॅक्टरमध्ये ठेवले होते़ त्यामुळे रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी या वाहनांची गर्दी दिसून येत होती़ ---------------------जनावरांच्या वाहनांची गर्दीकार्तिकी यात्रेला पंढरपुरात जनावरांचा मोठा बाजार भरतो़ लाखोंच्या संख्येने जनावरे या वारीला येतात़ त्यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते़ मंगळवारी कार्तिकी वारी असली तरी गेल्या दोन-तीन दिवसांपासून पंढरीकडे येणाºया सर्व मार्गावर खोंड, गाय, बैल, म्हशी, रेडा ही जनावरे टेम्पो, पिकअप, ट्रक, छोटा हत्ती या वाहनांमधून घेऊन पशुपालक येत आहेत़ शिवाय सोबत जनावरांना चार ते पाच दिवस पुरेल इतका चाराही वाहनाच्या टपावर बांधून ही वाहने पंढरीच्या दिशेने येत आहेत़ पूर्वी जनावरांचा बाजार समितीच्या आवारात भरत होता, परंतु गतवर्षीपासून हा बाजार वाखरी येथे हलविण्यात आला आहे़ त्यामुळे वाखरीकडे जाणाºया रस्त्यावर वाहनांची गर्दी दिसून येत आहे़