शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
2
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
3
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
4
या देशाने आधीच भारतासोबत पंगा घेतला होता, आता पाकिस्तानचा उल्लेख करून ट्रम्प यांची स्तुती केली
5
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
6
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
7
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
8
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
9
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
10
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
11
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
12
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
13
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
14
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
15
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
16
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
17
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
18
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
19
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
20
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा

न्यायाधीशांवर उगारली कु-हाड; सुरक्षेत हलगर्जीपणा, सोलापुरातील पाच पोलीस निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 01:44 IST

न्यायालयीन कामकाज सुरू असताना कोर्टात कु-हाड घेऊन आलेल्या व्यक्तीस पकडण्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी पाच पोलिसांना शनिवारी निलंबित करण्यात आले.

सोलापूर : न्यायालयीन कामकाज सुरू असताना कोर्टात कु-हाड घेऊन आलेल्या व्यक्तीस पकडण्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी पाच पोलिसांना शनिवारी निलंबित करण्यात आले.फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार मल्लिकार्जुन पालवे, शहर पोलीस मुख्यालयातील सहायक फौजदार भीमाशंकर मारुती वाघे, विजापूर नाका पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार वसंत चिंतामणी जैन, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे हवालदार अशोक बाबूराव गावित, जेलरोड पोलीस ठाण्यातील पोलीस ज्ञानदेव खंडू कोळेकर अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत.पोपट श्यामराव नलावडे (वय ६७, रा. हळदुगे, ता. बार्शी) हा माहिती अधिकाराखाली माहिती मागण्यासाठी २० डिसेंबर रोजी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यू. बी. हेजीब यांच्या कोर्टात आला होता. अपील कामकाजासाठी येऊन तो कागदपत्रावर पोहोच मागत होता. त्या वेळी पोहोच देता येणार नाही असे न्यायाधीशांनी सांगितले असता, त्याने सोबत आणलेली कुºहाड बाहेर काढली. न्यायाधीश हेजीब यांनी न्यायालयात ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचाºयांना बोलावले. १० ते १५ मिनिटांनी पोलीस पोहोचले तसेच पोलिसांनी या वेळी केवळ बघ्याची भूमिका घेतली.ही बाब पोलिसांची प्रतिमा मलीन करणारी असल्याने पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी पाचही जणांना निलंबित केले. यापूर्वी २ नोव्हेंबर रोजी व्यंकटेश बंदगी हा आरोपी कुºहाड घेऊन आला होता. या वेळी हलगर्जीपणा केला म्हणून एका महिला पोलिसास निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर दुसºयांदा हा प्रकार घडला आहे.कर्तव्यात कसूर केल्याने कारवाई करण्यात आली. ड्युटीवरील कर्मचाºयांनी सजगता दाखवायला हवी होती. कर्तव्यात हलगर्जीपणा केल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे सोलापूरचे पोलीस आयुक्त महोदव तांबडे यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूर