शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरातील वन स्टॉप सेंटरसाठी जिजामाता हॉस्पिटलची जागा मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 11:57 IST

आढावा बैठकीत झाला निर्णय, अहवाल पाठविण्याचे विजयसिंह मोहिते-पाटील यांचे आदेश

ठळक मुद्देदेशभरात वन स्टॉप सेंटर कार्यान्वित करण्यात येत आहेसोलापूर जिल्ह्यात हे केंद्र सुरू करण्याच्या कामाला गतीशहरातील जिजामाता हॉस्पिटलमधील जागा देण्याची तयारी

सोलापूर : महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने सुरू करण्यात येणाºया वन स्टॉप सेंटरसाठी शहरातील जिजामाता हॉस्पिटलमधील जागा देण्याची तयारी महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दर्शविली आहे. या जागेची पाहणी करून त्याबाबतचा प्रस्ताव तातडीने पाठवावा, अशा सूचना खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी दिल्या.

अत्याचारग्रस्त पीडित महिलांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने देशभरात वन स्टॉप सेंटर कार्यान्वित करण्यात येत आहे. खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी नुकतीच केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात हे केंद्र सुरू करण्याच्या कामाला गती मिळाली.

जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात बैठक घेण्यात आली. प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव गणेश मंझा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमेध अंदूरकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजय खोमाणे, माजी नगरसेवक प्रवीण डोंगरे यांच्यासह  सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित  होते.

खासदार मोहिते-पाटील म्हणाले, पीडित महिलांना वैद्यकीय, समुपदेशन, कायदेविषयक यांसारख्या अन्य सुविधा एकाच छताखाली तात्काळ मिळाव्यात, यासाठी वन स्टॉप सेंटर महत्त्वाचे आहे. या सेंटरसाठी केंद्र शासनाकडून आवश्यक बाबींसाठी निधी उपलब्ध होणार आहे. 

महापालिकेच्या जिजामाता हॉस्पिटल येथील जागा उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी आयुक्त ढाकणे     यांनी जागा उपलब्ध करून देण्याबाबत सहमती दर्शवली.  महिला व बालविकास अधिकारी  यांनी त्या जागेची पाहणी                       करून त्याबाबत आवश्यक  कार्यवाही करावी. जागा उपलब्धतेबाबतचा प्रस्ताव केंद्रीय महिला व बालविकास विभागाकडे सादर करावा, अशा सूचना मोहिते-पाटील यांनी केल्या.

टॅग्स :Solapurसोलापूरwomen and child developmentमहिला आणि बालविकास