शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

जीप गाडीतून आले अन् नवऱ्याला उचलून घेऊन गेले; पुढे काय झालं नक्की वाचा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 08:43 IST

पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल 

पंढरपूर : एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाने पंढरपूरनजीक असलेल्या लक्ष्मीटाकळी या गावात एक अपहरणाची घटना सोमवारी रात्री साडे आठच्या सुमारास घडली आहे. जीप गाडीतून आले अन् नवऱ्याला उचलून घेऊन गेले, अशी अपहरण झालेल्या व्यक्तीच्या पत्नीने पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्रार दिली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिता बंडु शिंदे  (वय ४२,  रा.टाकळी रोड प्रतिभाताई नगर, लक्ष्मी टाकळी, ता.पंढरपूर, जि.सोलापूर) यांचे टाकळी रोड माळीवस्ती सुहासनी दुग्धालयाशेजारी शिवपार्वती किराणा दुकाना आहे. 

या दुकानासमोरून २ मोटारसायकलवरून आलेल्या ४ इसम  व १ काळ्या रंगाच्या बोलेरो जीपमधुन २ इसम आले. या  ६ अनोळखी इसमांनी पैशाचे कारणावरून अनिता यांचे पती बंडु ज्ञानोबा शिंदे (वय ४६, रा. प्रतिभाताई नगर, टाकळी रोड, पंढरपुर) यांना जबरदस्तीने पळवुन घेवुन गेले आहेत. याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात भा.द.वि.क ३६५,३४ प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला आहे.

अपहरण कर्त्यांनीच आणून सोडले

अनिता शिंदे यांनी पतीच्या अपहरण झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. यानंतर काही वेळाने अपहरणकर्त्यांनीच बंडू शिंदे यांना बुधवारी दुपारी चार वाजता  घराजवळ आणून सोडले. या प्रकरणात  एका बड्या नेत्याचा व कारखान्याच्या गाडीचा वापर झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस