शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

चार मृत उंटांना पुरण्यासाठी ‘जेसीबी’ने खोदले वीस फुटांचे खड्डे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 13:03 IST

राजस्थानहून हैदराबादकडे जाणाºया मालट्रकमध्ये गुदमरून मरण पावलेल्या उंटावर सोलापुरात अंत्यसंस्कार

ठळक मुद्देउंटांना गोशाळेतून महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयात ठेवण्याबाबत विचार केला जात आहेमहापालिका आयुक्त दीपक तावरे यांना भेटून चर्चा केली जाणार आहेप्राणिसंग्रहालयात उंटांचा समावेश झाल्यास त्यांची सोय होईल

सोलापूर : राजस्थानहून हैदराबादकडे जाणाºया मालट्रकमध्ये गुदमरून मरण पावलेल्या चार उंटांचे शवविच्छेदन करून, तुळजापूर नाका येथील कचरा डेपो जवळ अंत्यसंस्कार करण्यात आले. जिवंत असलेल्या दहा उंटांचे गोशाळेत पालन पोषण केले जात आहे. 

शनिवारी सायंकाळी हैदराबाद रोडवरील एका हॉटेलसमोर संशयित मालट्रकला थांबवण्यात आले होते. गोसेवकांनी मालट्रकची पाहणी केली असता, त्यात १४ उंट निर्दयीपणे बांधण्यात आल्याचे निदर्शनास आले. मालट्रक शेळगी येथील पोलीस चौकीजवळ नेऊन चौकशी केली असता, सर्व उंट राजस्थानवरून कत्तल करण्यासाठी हैदराबाद येथे घेऊन जात असल्याचे चालकाने सांगितले.

पकडण्यात आलेले १४ उंट मरिआई चौकातील अंतरिक्ष गो शाळेत नेण्यात आले. उंट मालट्रकमधून बाहेर काढल्यानंतर त्यातील चार उंटांचा मृत्यू झाला. गोसेवकांनी पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांना बोलावून घेतले. पोलीस पंचनामा करून चार उंटांचे शवविच्छेदन करण्यात आले. 

शवविच्छेदनानंतर मेलेल्या उंटांना कचरा डेपोजवळ नेण्यात आले. कचरा डेपोच्या पाठीमागे असलेल्या महानगरपालिकेच्या जागेत २० फूट खोल व २० फूट लांबीचा खड्डा खोदण्यात आला. खड्ड्यात एका बाजूला एक अशा चार उंटांना पुरून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

खाद्याची माहिती घेतली जात आहे...- मालट्रकमधील पकडण्यात आलेल्या १0 उंटांच्या खाद्याची माहिती घेतली जात आहे. सध्या या उंटांना कडुलिंबाचा पाला व पाणी दिले जात आहे. विजापूर वेस येथे उंट पालक असून त्यांच्याशी संपर्क साधून खाद्याची माहिती घेतली जाणार आहे. उंटाला लागणारे खाद्य घेऊन ते देण्याचे नियोजन सध्या अखिल भारतीय कृषी गोसेवक करीत आहेत. 

उंटांना गोशाळेतून महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयात ठेवण्याबाबत विचार केला जात आहे. महापालिका आयुक्त दीपक तावरे यांना भेटून चर्चा केली जाणार आहे. प्राणिसंग्रहालयात उंटांचा समावेश झाल्यास त्यांची सोय होईल. -सुधीर बहिरवाडे, जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय कृषी गोसेवा संघ, 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका