शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

खासदार जयसिद्धेश्वर महास्वामींचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 00:56 IST

एप्रिल २0१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी बेडा जंगम जातीचे प्रमाणपत्र सादर केले होते.

सोलापूर : लोकसभा निवडणुकीत बनावट जातप्रमाणपत्र सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी दाखल केलेला अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. पी. आव्हाड यांनी शनिवारी फेटाळला. या प्रकारामुळे सदर बझार पोलिसांना खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांना अटक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.एप्रिल २0१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी बेडा जंगम जातीचे प्रमाणपत्र सादर केले होते. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या सोलापूरच्या लोकसभा मतदारसंघात बेडा जंगम जातीचे बनावट प्रमाणपत्र जोडून फसवणूक केल्याची तक्रार रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (पी.जी़) प्रदेशाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी सामाजिक न्यायभवन येथील जातपडताळणी समितीकडे केली होती. जातपडताळणी समितीने केलेल्या चौकशीत बेडा जंगम हा जातीचा दाखला बनावट असल्याचे सिद्ध झाले. जातपडताळणी समितीने या प्रकरणी अक्कलकोट तहसीलदारांना न्यायालयात फिर्याद देण्याची सूचना केली होती. अक्कलकोट तहसीलदारांनी सोलापूर न्यायालयात फिर्याद दिली होती. जिल्हा व सत्र न्यायालयात मुख्य न्यायदंडाधिकारी के. पी. जैन देसरडा यांनी सदर बझार पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्यावर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळला आहे. या प्रकरणी आम्ही मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करणार आहोत, अशी माहिती अ‍ॅड. संतोष न्हावकर यांनी दिली.