शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात जय श्रीरामचा नारा; हिंदू गर्जना मोर्चात हजारो तरूणांचा सहभाग

By appasaheb.patil | Updated: February 26, 2023 17:37 IST

मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांसोबत सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध संस्था, संघटनांनी मोठा सहभाग नोंदविला आहे. 

सोलापूर : सकल हिंदू समाजातर्फे लव्ह जिहाद विरोधी, धर्मांतरण विरोधी कायदा व्हावा, गोहत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा बलिदान दिवस (फाल्गुन अमावस्या) धर्मवीर दिन म्हणून शासनाकडून घोषित व्हावा या प्रमुख चार मागण्यांकरिता विराट हिंदू गर्जना मोर्चा रविवारी साडेचार वाजण्याच्या सुमारास सोलापुरात निघाला. या मोर्चात सहभागी झालेले हजारो तरूणांनी भगवे झेंडे फडकावित जय श्रीरामचा नारा दिला. या मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांसोबत सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध संस्था, संघटनांनी मोठा सहभाग नोंदविला आहे. 

या मोर्चाला छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातून प्रारंभ झाला. बाळीवेस, टिळक चौक, मधला मारुती, माणिक चौक, श्री सोन्या मारुती, श्री दत्त मंदिर, सावरकर मैदान, सुभाष चौक, सरस्वती चौकमार्गे हिंदू गर्जना मोर्चा चार हुतात्मा पुतळा येथे विसर्जित होत आहे. या मोर्चाच्या समारोपाला प्रखर हिंदुत्ववादी नेते धनंजय देसाई यांचे मार्गदर्शन करणार आहेत.

याबाबत गोरांटला म्हणाले, देशात लव्ह जिहादची समस्या हिंदूंना मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. तसेच अनेक गावांमध्ये हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केले जात आहे. गोहत्या बंदीचा कायदा लागू आहे. मात्र त्याची कठोर अंमलबजावणी होत नसल्यामुळे दररोज हजारो गाई कापल्या जात आहेत. त्यामुळे या सर्व समस्यांवर कठोर उपाय योजना कायद्याद्वारे करावी आणि धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराजांचा बलिदान दिवस म्हणजेच फाल्गुन अमावस्या हा दिवस 'धर्मवीर दिन' म्हणून सरकारने घोषित करावा अशी आमची मागणी असल्याचे सांगितले. 

टॅग्स :Solapurसोलापूर