शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सोलापूर-बार्शीमधील ७० किमीचे अंतर पोहोचायला लागतात साडेतीन तास

By appasaheb.patil | Updated: November 12, 2019 11:03 IST

रस्त्यावर पडले मोठमोठे खड्डे; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष; खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा ताबा सुटतो अन् घडतो अपघात

ठळक मुद्देसोलापूर-बार्शी या महामार्गावरील रस्त्याची वाट लागलेली असताना अधिकारी व पदाधिकारी संवेदनशील नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहेया खड्ड्यातून मार्ग काढताना दुचाकी, चारचाकी व मालवाहतूक गाड्यांच्या वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

सुजल पाटील

सोलापूर : सोलापूर ते बार्शी हे ७० किलोमीटरचे अंतर... सोलापूरहून बार्शीला पोहोचण्यासाठी साहजिकच दीड तासाचा अवधी पुरेसा... मात्र मागील सहा महिन्यांपासून या रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे सोलापूरहून बार्शीला पोहोचायला तब्बल तीन ते साडेतीन तास लागतात़ एवढेच नव्हे तर या रस्त्यावरील खड्ड्यात गाड्या आदळून वाहनचालकांचा गाडीवरचा ताबा सुटतो अन् अपघात होतो़ हे आता नित्याचेच बनले आहे़ त्वरित रस्ता दुरुस्त करावा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील संस्था, संघटना व ग्रामस्थांनी उत्तर सोलापूर तालुका सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.

रस्त्यावर पडलेले खड्डे़़़ नियमित होणारे किरकोळ अपघात अन् संबंधित अधिकाºयांचे दुर्लक्ष हे सोलापूर-बार्शी मार्गावरील असलेल्या प्रत्येक गावातील ग्रामस्थांसाठी काही नवं नाही़ सध्या सोलापूर-बार्शी मार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत़ त्यामुळे वाहनधारकांना या मार्गावरून आपलं घर गाठताना मरणाच्या दाढेतून जातोय की काय, अशी प्रचिती येत आहे़ सोलापूर-बार्शी या महामार्गावरील चाळण झालेल्या रस्त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. त्यामधूनही दररोज एखाद् दुसरा लहान-मोठा अपघात होत आहे तर काही जणांना अपंगत्व आलेले आहे. 

सोलापूर-बार्शी या महामार्गावरील रस्त्याची वाट लागलेली असताना अधिकारी व पदाधिकारी संवेदनशील नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सोलापूरहून बार्शीकडे निघाले असता मार्डी फाट्यापासून बार्शीपर्यंत रस्ता खराब झालेला आहे़ यातच गुळवंची, कारंबा, नान्नज, वडाळा, राळेरास, शेळगाव, वैराग परिसरात मोठमोठे खड्डे पडलेले आहेत़ या खड्ड्यातून मार्ग काढताना दुचाकी, चारचाकी व मालवाहतूक गाड्यांच्या वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

गाड्यांचे होतेय नुकसानसोलापूर-बार्शी मार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे़ सातत्याने खड्ड्यांचा सामना करणाºया वाहनधारकांच्या गाड्यांचेही नुकसान होत आहे़ एवढेच नव्हे तर खड्ड्यात गाडी आदळल्यामुळे गाडीचा ताबा सुटून दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत़ या मार्गावरून जाणाºया एसटी महामंडळाच्या गाड्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे एसटीचालक गजानन सुतार यांनी सांगितले़ 

सोलापूर-बार्शी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत, हे खरे आहे़ मात्र पावसामुळे रस्ता दुरुस्त करण्यास अडचण येत होती़ आता मागील दोन-तीन दिवसांपासून पाऊस बंद झाला असून, आजपासून रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल़ सोलापूर ते वडाळ्यापर्यंतचे खड्डे बुजविण्यात येतील़ - संभाजी धोत्रे, कार्यकारी अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १, सोलापूर

मागील काही दिवसांपूर्वी उत्तरचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख जेऊरकर यांना रस्ता दुरुस्त करण्यासंदर्भात निवेदन दिले होते़ त्यावेळी त्यांनी दोन ते तीन दिवसात खड्डे बुजविण्याचे आश्वासन दिले होते़ मात्र निवेदन देऊन सात दिवस उलटले तरीही या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात बांधकाम विभागाला यश आले नाही़ येत्या काही दिवसात रस्ता दुरुस्त न झाल्यास नाईलाजास्तव रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल़- प्रा. विनायक सुतार, रहिवासी, कारंबा

गेल्या वर्षभरापासून या रस्त्याची वाट लागली आहे़ नवा रस्ता होणाऱ़़ नवा रस्ता होणार हेच सांगण्यात येत आहे़ मात्र नवा रस्ताच काय पण जुन्या रस्त्याची दुरुस्तीही करता आली नाही़ सोलापूर-बार्शी महामार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे़ दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत़ त्वरित रस्ता दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल़ - फिरोज पठाण, सचिव, मौलाना आझाद विचार मंच, अकोलेकाटी.

टॅग्स :Solapurसोलापूरroad safetyरस्ते सुरक्षाbarshi-acबार्शी