शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

अल्लाहवरील श्रद्धेतून रोजा करण्याची मिळते ऊर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 13:39 IST

रमजान ईद विशेष; उन्हाची तमा न बाळगता ज्येष्ठ नागरिकही करतात उपवास

ठळक मुद्देइस्लाममध्ये पाच अंमल सांगण्यात आले आहेत. या पाच अंमलमध्ये अल्लाहवरील श्रद्धा, नमाज, रोजा, जकात आणि हज यांचा समावेश आहेअल्लाहची भक्ती करत असताना त्यातूनच उपवास करण्याची ऊर्जा मिळते

सोलापूर : इस्लाममध्ये रमजान महिन्यात रोजा करण्याला मोठे महत्त्व आहे. इस्लाममध्ये सांगण्यात आलेल्या पाच अंमलपैकी रोजा हा एक महत्त्वाचा अंमल आहे. यावर्षी रमजान मे महिन्यात आल्यामुळे रोजा करणाºया व्यक्तीस याचा त्रास होतो, असे असतानादेखील ज्येष्ठ नागरिक रोजा करतातच.

इस्लाममध्ये पाच अंमल सांगण्यात आले आहेत. या पाच अंमलमध्ये अल्लाहवरील श्रद्धा, नमाज, रोजा, जकात आणि हज यांचा समावेश आहे. रमजान महिन्यात मुस्लीम बांधव महिनाभर रोजा (उपवास) करतात. अल्लाहची भक्ती करत असताना त्यातूनच उपवास करण्याची ऊर्जा मिळते. यामुळे रोजा करत असतानादेखील कोणताही त्रास होत नसल्याचे रोजा करणाºया ज्येष्ठ नागरिकांचे मत आहे. 

जवळपास दर ३३ वर्षांनंतर उन्हाळ्यात रमजान महिना येतो. उन्हामुळे रोजा करताना काही अडचणी येतात. या महिन्यात पहाटे चार ते साडेचारदरम्यान सहेरी करण्यात येते. त्यानंतर कुरआनचे पठण केले जाते. सकाळी आठ वाजल्यानंतर कामाला सुरुवात करतो. दुपारी तीन ते पाच आराम करतो. त्यानंतर सहेरीची तयारी करतो. रोजादरम्यान कितीही तहान लागली तरी पाणी पित नाही. अल्लाहची ईबादत करण्यात खरे समाधान आहे.डॉ. रफिक सय्यद

१९५५ मध्ये मी पाच वर्षांचा होतो, तेव्हापासून उपवास करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आता तिसºयांदा मे महिन्यात रमजान आला आहे. मे महिन्यात ऊन असल्यामुळे काळजी घ्यावी लागते. आता मी ७० वर्षांचा असून, सेवानिवृत्त झाल्यानंतर एका खासगी ठिकाणी काम करत आहे. काम करत असतानादेखील मी रोजा करतो. यामुळे जे गरीब आहेत, ज्यांना खायला मिळत नाही, त्यांचे दु:ख समजायला मदत होते.- रजाक दखणी

हा देह अल्लाहने दिला आहे. अल्लाहसाठी जर हा देह झिजला तर काही फरक पडत नाही. रमजान महिन्यात रोजा केल्याने अल्लाहच्या जवळ जाता येते. या महिन्यात मी दिवसातून पाच वेळा नमाज अदा करतो. रोजा करत असताना घसा कोरडा पडतो. शरीराची उष्णता वाढते. कामावर मला जास्त बोलावे लागते़ त्यामुळे थोडा त्रास होतो. पण हे सहन करण्याची ताकददेखील अल्लाहच देतो.- महिबूब शेख

रमजान महिन्यात मक्का-मदिना येथे जाणे खूप महत्त्वाचे समजले जाते. यंदाच्या रमजान महिन्यात मी मदिना येथे गेलो आहे. या भागात उन्हाचे प्रमाण जास्त आहे. तरीदेखील रमजानमधील सर्व रोजे तसेच दर शुक्रवारी उमराही करतो. यादरम्यान अल्लाहकडे प्रार्थना करतो. यातून मोठे आत्मीक समाधान मिळते. रोजा केल्याने मन शांत तर राहतेच यासोबतच इतरांच्या कल्याणासाठी आराधना केल्याचे सुखही मिळते. - इक्बाल बाबूमियाँ शेख

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिकRamzan Eidरमजान ईद