शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

गंभीर गुन्हे असलेल्यांना आरोप करणे शोभते का? सोलापूरातील भाजपा नेत्यांचा सवाल, काँग्रेसविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 09:22 IST

ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत ते काँग्रेस नेते चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्व असलेल्या सहकारमंत्री सुभाष देशमुखांवर आरोप करीत आहेत. त्यांना हे शोभत नाही. देशमुखांनी सहकारामध्ये सुधारणा केल्यामुळे या नेत्यांची झोप उडाली आहे.

ठळक मुद्दे काँग्रेस नेत्यांनी तत्काळ देशमुखांची माफी मागावी; अन्यथा भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर उतरतीलदोन दिवसांपासून काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्त्यांमधील वातावरण चांगलेच पेटले आहे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी भाजपा नेत्यांचे निवेदन स्वीकारले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २२ : ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत ते काँग्रेस नेते चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्व असलेल्या सहकारमंत्री सुभाष देशमुखांवर आरोप करीत आहेत. त्यांना हे शोभत नाही. देशमुखांनी सहकारामध्ये सुधारणा केल्यामुळे या नेत्यांची झोप उडाली आहे, असा आरोप भाजपाचे उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम आणि दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी यांनी केला. काँग्रेस नेत्यांनी तत्काळ देशमुखांची माफी मागावी; अन्यथा भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील, असा इशाराही दिला. माळकवठे (ता. दक्षिण सोलापूर) येथील कार्यक्रमात बोलताना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर गंभीर टीका केली होती. त्याला उत्तर देताना काँग्रेसचे माजी आमदार दिलीपराव माने सहकारमंत्री सुभाष देशमुखांवर गंभीर आरोप केले. दोन दिवसांपासून काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्त्यांमधील वातावरण चांगलेच पेटले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या तालुकाध्यक्षांनी बुधवारी जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन काँग्रेस नेत्यांवर कारवाईची मागणी केली. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी भाजपा नेत्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी भाजपा नेते इंद्रजित पवार, नगरसेवक नागेश वल्याळ, अश्विनी चव्हाण, मेनका राठोड, लक्ष्मी कुरुड, सुभाष शेजवाल, संतोष भोसले, माजी सभापती संभाजी भडकुंबे, श्रीकांत ताकमोगे, श्रीमंत बंडगर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. रामप्पा चिवडशेट्टी म्हणाले, लोकमंगल ही आता एक चळवळ बनली आहे. सुभाष देशमुख त्याचे प्रवर्तक आहेत. ही चळवळ असंख्य लोकांचा आधार बनली आहे. शेतकºयांच्या प्रत्येक समस्येला लोकमंगलने पर्याय दिला आहे. नडलेल्यांना, आडलेल्यांची लग्ने, रिकाम्या हाताला काम, वृद्धांच्या रिकाम्या पोटाला वेळेवर देणारी लोकमंगल काँग्रेस नेत्यांची मुख्य अडचण ठरली आहे. त्यामुळे या नेत्यांचा राग हा भाजपावर कमी आणि लोकमंगलवर जास्त आहे. त्यांची गावोगावी असलेली मक्तेदारी या चळवळीने संपविली आहे. त्यांच्या नाकाला मिरच्या  झोंबल्या आहेत. 

टॅग्स :Solapurसोलापूर