याबाबत वरील तिघांनी १८ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन हे पत्र दिले आहे. या विस्तृत पत्रात त्यांनी म्हटले आहे की, विद्यमान शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या पक्ष निष्ठेबद्दल शंका नाही परंतु हे पदाधिकारी मागील अनेक वर्षापासून आपापल्या परिसरामध्ये पक्ष संघटना वाढवण्यासाठी कमी आहेत. यांच्या नेतृत्वाखाली येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जिंकणे अशक्य असल्याने सध्याच्या पक्ष संघटनेत मोठे बदल करणे गरजेचे आहे.
याच पत्रातून आमदार बबनराव शिंदे व आमदार संजय शिंदे यांच्यावरही निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचे असले तरी लोकांची कामे करताना तसा अनुभव येत नाही. जिल्ह्यातील कोणतेही अधिकारी विशेष करून जिल्हाधिकारी फक्त राष्ट्रवादीचे काम करतात. आघाडी शासनाने केलेली कामे राष्ट्रवादीचे आमदार आपणच केल्याचा डांगोरा पिटतात. या सर्व मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी ठाकरे यांची वेळ मागितली आहे.
----
चर्चा रंगली
या पत्रामुळे शिवसेनेतील खदखद पुढे आली असून विद्यमान पदाधिकारी यावर काय भूमिका घेणार? या पत्रातून नेमका कोणत्या पदाधिकाऱ्यांवर नेम धरला आहे. याबाबत चर्चा रंगली आहे.
----