शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वानखेडेपेक्षा मोठे असलेल्या पार्क मैदानावर होतील आयपीएल अन् रणजी सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 12:01 IST

स्मार्ट सिटीतून सुशोभिकरणाचे काम प्रगतीपथावर; वानखेडे मोठे आहे पार्क स्टेडियम...

ठळक मुद्दे सुशोभीकरणासह मैदानाच्या मध्यभागी ११ खेळपट्ट्या तर बाजूला सरावासाठी ८ खेळपट्ट्या तयार केल्या जात आहेतमुंबईच्या वानखेडे स्टेडियमचा परीघ ६५ मीटर आहे. त्यापेक्षा सोलापूरचे स्टेडियम मोठे आहेस्मार्ट सिटीचे सीईओ पी. शिवशंकर, मुख्य तांत्रिक अधिकारी संजय धनशेट्टी, उपमुख्य तांत्रिक अधिकारी तपन डंके कामावर लक्ष ठेवून आहेत

सोलापूर : येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर आयपीएल, रणजी सामने व्हावेत यासाठी स्मार्ट सिटी योजनेतून स्टेडियमचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. २९ डिसेंबर २०१९ पासून सुरू झालेले हे काम आता प्रगतिपथावर आहे. भविष्यात नक्कीच आयपीएल अन् रणजी सामने या मैदानावर होतील असा विश्वास सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेम्बुर्स यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.

दरम्यान, एकूण ७.६१ कोटी रुपयांचा खर्च करून होत असलेल्या या मैदानावर सुशोभीकरणासह मैदानाच्या मध्यभागी ११ खेळपट्ट्या तर बाजूला सरावासाठी ८ खेळपट्ट्या तयार केल्या जात आहेत.

पार्कवरील ७२ मीटरच्या परिघात मैदान तयार केले जात आहे. यातील ३० मीटरच्या परिघात खेळपट्ट्या तयार केल्या जात आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमचा परीघ ६५ मीटर आहे. त्यापेक्षा सोलापूरचे स्टेडियम मोठे आहे. या स्टेडियमची २२ हजार प्रेक्षक क्षमता आहे.

खेळपट्टीसाठी विविध प्रकारचे थर रचण्यात आले आहेत. त्यावर ३० टक्के लाल माती, ३० टक्के काळी माती व शेणखत, ४० टक्के पोयटा माती वापरण्यात आली आहे. सध्या माती पसरविण्यासह संपूर्ण मैदानात बर्मुडा ग्रास लावण्याचे काम सुरू आहे.पुण्याचे कृष्णाई कन्स्ट्रक्शन काम करीत आहे. कामाच्या गुणवत्तेसाठी भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक लालचंद रजपूत, टीम इंडियाचे क्युरेटर पांडुरंग साळगावकर, राहुल खलाटे हे अभियंत्यांना नियमित मार्गदर्शन करीत आहेत. स्मार्ट सिटीचे सीईओ पी. शिवशंकर, मुख्य तांत्रिक अधिकारी संजय धनशेट्टी, उपमुख्य तांत्रिक अधिकारी तपन डंके कामावर लक्ष ठेवून आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरSmart Cityस्मार्ट सिटीSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका