शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मुलाखत ; सलाईनचा अतिवापर किडनीला धोकादायक : डॉ़ किशोर इंगोले

By appasaheb.patil | Updated: November 24, 2018 16:25 IST

सोलापूर : चिकुनगुन्या, सांधेदुखीने त्रस्त असलेले ग्रामीण भागातील रुग्ण मान्यताप्राप्त पदवी नसलेल्या डॉक्टरांकडे जातात. त्यांच्याकडून प्रामुख्याने अशा आजारांवर सलाईनचा ...

ठळक मुद्देसध्या सोलापूर शहरासह जिल्ह्यातील हवामान दिवसेंदिवस बदलत आहे. अवकाळी पावसाच्या सरी, भिज पाऊस झाल्यानेही वातावरणातील हा बदल रुग्णांना त्रासदायक रुग्णांच्या आजारानुसार सलाईनचे प्रमाण किती द्यावे याला वैद्यकीय क्षेत्रात काही दंडक

सोलापूर : चिकुनगुन्या, सांधेदुखीने त्रस्त असलेले ग्रामीण भागातील रुग्ण मान्यताप्राप्त पदवी नसलेल्या डॉक्टरांकडे जातात. त्यांच्याकडून प्रामुख्याने अशा आजारांवर सलाईनचा (आयव्ही) मारा मोठ्या प्रमाणात केला जातो़ वास्तविक रुग्णांच्या आजारानुसार सलाईनचे प्रमाण किती द्यावे याला वैद्यकीय क्षेत्रात काही दंडक आहेत. सलाईनमध्ये सोडियम पोटॅशियम असते. त्याचे अधिक प्रमाण झाल्यास थेट किडनीवर परिणाम होतो अशी धक्कादायक माहिती डॉ. वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ़ किशोर इंगोले यांनी दिली.

सोलापूर शहर-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू, चिकुनगुन्या अशा सांधेदुखीने अनेकांना त्रस्त केले आहे. खासगी, सरकारी अशा रुग्णांची उपचारासाठी वर्दळ वाढली आहे. दोन दिवसांपासून अवकाळी पावसाच्या सरी, भिज पाऊस झाल्यानेही वातावरणातील हा बदल रुग्णांना त्रासदायक ठरु  लागला आहे. डेंग्यूच्या आजाराशी सामना करताना अस्थमानी त्रस्त असलेल्या रुग्णांनी काय खबरदारी घ्यावी यावर डॉ. वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ़ किशोर इंगोले यांच्याशी साधलेला संवाद.

प्रश्न : सध्या हवामान बदलत आहे यावर काय सांगाल ?उत्तर :  गेल्या काही दिवसांपासून दिवसा कडक ऊन, रात्री कुडकुडणारी थंडी मध्येच ढगाळ वातावरण असा  सातत्याने वातावरणामध्ये बदल होत आहे. त्यातच चिकुनगुनिया, सांधेदुखीचे आजार, स्वाईन फ्लूसारखे आजार आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक ठरताहेत. सध्याचा काळ हा मादी डासांना प्रजननासाठी पोषक काळ आहे. डेंग्यूचे विषाणू वेगाने पसरु शकतात. अशावेळी नागरिकांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आसपास साचलेले डबके निष्काम करावेत.

प्रश्न : साथीच्या आजाराबाबत रूग्णांची काय काळजी घ्यायला हवी ?उत्तर : साथीच्या आजारांमुळे रूग्णांना विविध प्रकारचे आजार उदभवतात़ यातील काही रूग्णांना स्वाईन फ्लूची लागण झालेली असेल तर त्यांनी वेळोवेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावीत. दुर्लक्ष केल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. सरकारी दवाखान्यात या संबंधी पुरेशी यंत्रणा कार्यान्वित केली आहे याचा लाभ घ्यावा.

प्रश्न : साथीचे आजार पसरण्याचे काय कारण ?उत्तर : पावसामुळे साचलेल्या स्वच्छ पाण्यात डासांची पैदास वाढते. आपल्या आसपास पाणी साचलेली ही डबके नाहीशी केली पाहिजेत. शिवाय घरातील पाण्याचा साठा आठवड्यातून एकवेळा बदलावा. कोरडा दिवस पाळावा या नित्याच्या बाबींबद्दल शासकीय आरोग्य यंत्रणेमार्फत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा.

प्रश्न : साथीच्या आजारांबाबत रूग्णांनी काय काळची घ्यायला हवी ?उत्तर : सध्या सोलापूर शहरासह जिल्ह्यातील हवामान दिवसेंदिवस बदलत आहे. दिवसा असणारे ढगाळ वातावरण पण पाऊस नाही, उदासीन वाटणे, मनामध्ये येणारा नकारात्मक सूर या बाबीही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी करणाºया आहेत. अशावेळी मानसोपचार तज्ज्ञांकडून सकारात्मता बाळगावी, अशाही सूचना वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून होत आहेत. व्याधीनी त्रस्त असलेल्या नागरिकांनी प्रथमदर्शनी आजाराची कुणकुण असणारी जाणीव झाल्यास लागलीच दक्षता घ्यावी़ रुग्णांनी अधिकृत पदवी घेतलेल्या डॉक्टरांकडून तपासणी करून निदान करुन घ्यावे. अन्यथा आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो असाही सल्ला इंगोले यांनी दिला आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरhospitalहॉस्पिटलdengueडेंग्यू