रवींद्र देशमुख, सोलापूर: शेतामध्ये फवारण्यासाठी कीटकनाशकाच्या बाटलीचं टोपन तोंडानं उघडताना विषारी औषध तोंडात गेल्यानं एका शेतकरी महिलेला दवाखान्यात भरती करावं लागलं. पंढरपूर तालुक्यातील तपकीर शेटफळ येथे सायंकाळी सातच्या सुमारास घरामध्ये ही घटना घडली. संध्या शंकर बाबर (वय- ४५) असे या महिलेचं नाव आहे. शेतातील तननाशकाला फवारण्यासाठी बाबर कुटुंबीयांनी कीटक नाशक घरी आणून ठेवले होते.
रविवारी या कीटकनाशकाची गरज असल्याने शेतकरी महिला संध्या बाब यांनी बाटलीचं टोपण तोंडानं उघडण्याचा प्रयत्न केला. यामुळे विषारी औषध तोंडामध्ये गेल्यानं संध्या यांना त्रास होऊ लागला. तातडीने तिचे वडील भारत शेळके यांनी अगोदर पंढरपूरच्या सरकारी दवाखान्यात उपचारासाठी नेले. तेथून सोमवारी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.