मनोहरमामांचा मठ हा कोरोना काळामध्ये व इतर वेळेस मोठ्या प्रमाणात चालू होता. काही वर्षांपूर्वी दौंड पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होण्यास मनोहर भोसले हा यशस्वी झाला होता. त्यानंतर या भोंदूबाबाचे एवढे मोठे प्रस्थ माजले असतानाही, स्थानिक पोलीस प्रशासनाने याकडे एवढी डोळेझाक का केली? व अशा भोंदूबाबाला पोलीस संरक्षण पुरविण्याचे कारण काय? हेही सर्व काही संशयाच्या भोवऱ्यात येत आहे. त्याचप्रमाणे या भोंदूबाबाबरोबर होत असलेल्या आर्थिक हितसंबंधांमध्ये कुठेतरी बाधा आली असेल, अशाप्रकारची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची व संबंधित नेते मंडळी, आजी-माजी पदाधिकारी यांचीही सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. अशा प्रकारची मागणी शेतकरी कामगार संघर्ष समितीतर्फे दशरथ कांबळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यसचिव यांच्याकडे केली आहे.
मनोहरमामासोबत फोटेसेशन करणाऱ्यांची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:26 IST