शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

अ‍ॅक्शन प्लॅनद्वारे तपश्चर्या केल्यास जिनिअस बनाल, अविनाश धर्माधिकारी, बार्शीत मातृभूमी प्रतिष्ठानतर्फे करिअर मार्गदर्शन मेळावा, सेवा-सुविधा केंद्राचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 13:10 IST

स्पर्धा परीक्षा व वैद्यकीय किंवा इंजिनिअरिंगमध्येच करिअर करता येते, असा चुकीचा समज आहे़ परीक्षेतील मार्कावरच बुद्धिमत्ता मोजता येत नाही़ जीवनात यशस्वी होण्यासाठी सुरुवातीला स्वत:ला ओळखा, आपल्याला आवड असलेल्या क्षेत्राची निवड करा

ठळक मुद्देप्रत्येक व्यक्तीमध्ये एखादा असामान्य गुण असतो. फक्त तो ओळखता आला पाहिजे - अविनाश धर्माधिकारीकरिअरला स्कोप नसतो तर तो व्यक्तीला असतो़ - अविनाश धर्माधिकारीहलाखीच्या परिस्थितीमुळे राज्यातील एकही रूग्ण उपचाराअभावी दगावू नये, असा संदेश त्यांनी दिला आहे - ओमप्रकाश शेटे

आॅनलाइन लोकमत सोलापूरबार्शी दि १५ : स्पर्धा परीक्षा व वैद्यकीय किंवा इंजिनिअरिंगमध्येच करिअर करता येते, असा चुकीचा समज आहे़ परीक्षेतील मार्कावरच बुद्धिमत्ता मोजता येत नाही़ जीवनात यशस्वी होण्यासाठी सुरुवातीला स्वत:ला ओळखा, आपल्याला आवड असलेल्या क्षेत्राची निवड करा आणि निवडलेल्या क्षेत्रात प्रतिभावंत होण्यासाठी मनाचा संकल्प करुन अ‍ॅक्शन प्लॅनद्वारे १० हजार तासांची तपश्चर्या करा, असे केल्यास तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात जिनिअस (अजब) बनल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केला.बार्शी येथील मातृभूमी प्रतिष्ठान संचलित करिअर मार्गदर्शन उपक्रम व सेवासुविधा केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रशांत कोल्हे होते. यावेळी मुख्यमंत्री सहायता कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश शेटे, अविनाश सोलवट, ‘लोकमत’चे संपादक राजा माने, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे, सचिव प्रताप जगदाळे, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, करिअर मार्गदर्शन उपक्रमाचे अध्यक्ष जयकुमार शितोळे, सेवासुविधा केंद्राचे अध्यक्ष अमित इंगोले उपस्थित होते.धर्माधिकारी म्हणाले, केवळ पुस्तकी ज्ञानावरच हुशारी अवलंबून नसून जगण्या-वागण्यातील हुशारी व इतरही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये एखादा असामान्य गुण असतो. फक्त तो ओळखता आला पाहिजे. आपल्याला जे सहज जमते व ज्यात आनंद वाटतो, तेच क्षेत्र निवडा असा सल्ला त्यांनी दिला. ज्या क्षेत्रात आपण काम करत आहोत ते काम मनापासून व प्रामाणिकपणे करा, तीच खरी देशसेवा व ईश्वराची आराधना आहे. करिअरला स्कोप नसतो तर तो व्यक्तीला असतो़ हे करीत असताना दररोज एक तासभर योग व स्वाध्याय केलाच पाहिजे. आपण जे कार्य करत आहोत, त्या माध्यमातून दु:खितांचे व शोषितांचे अश्रू पुसण्यातच खरा आनंद व जीवनाचे सार्थक आहे. गैरमार्गाने मिळवलेली संपत्ती ही कधीही मार्गी लागत नसते़ मातृभूमी प्रतिष्ठानने सुरू केलेल्या या उपक्रमाचे कौतुक करत व्हर्च्युअल क्लासरूमची चांगली व्यवस्था येथे उभा करू. पुणे-मुंबईच्या धर्तीवर जसे कोर्स दिले जातात, तसे येथे देऊ अशी ग्वाही दिली़ ओमप्रकाश शेटे म्हणाले, मुख्यमंत्री संवेदनशील असून, हलाखीच्या परिस्थितीमुळे राज्यातील एकही रूग्ण उपचाराअभावी दगावू नये, असा संदेश त्यांनी दिला आहे. प्रकरणे तत्काळ मार्गी लागण्यासाठी आपले अधिकार समितीला बहाल करणारे फडणवीस पहिले मुख्यमंत्री आहेत. सहायता निधीच्या तुटपुंजी असलेल्या २५ हजार रुपये रकमेत आपण मुख्यमंत्र्यांकडून वाढ करून घेऊन आता ही तीन लाखांवर केली आहे़ त्यामुळे रुग्णांना शेकडो कोटी रुपये मदत देता आली़ आपण ज्या क्षेत्रात काम करीत असतो, त्या ठिकाणी प्रामाणिकपणे केलेले कामदेखील एक देशसेवाच आहे़ कोणतीही जात, धर्म, पंथ न पाहता मानवता ही एकच जात मानून सर्वसामान्यांना शेकडो कोटी रुपये निधीचे आजपर्यंत वाटप केल्याचे सांगितले. मुख्याध्यापक प्रशांत कोल्हे यांनी प्रतिष्ठानने सुरू केलेल्या या उपक्रमास चाणक्य मंडळ परिवाराचीच उपशाखा समजून सहकार्य करावे,अशी अपेक्षा व्यक्त केली. ‘लोकमत’चे संपादक राजा माने यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी उत्कृष्ट बीडीओ म्हणून निवड झाल्याबद्दल प्रमोद काळे यांचा सत्कार करण्यात आला़ यावेळी तहसीलदार ऋषिकेत शेळके, पोलीस उपअधीक्षक विजय कबाडे उपस्थित होते़ सूत्रसंचालन मुकुंदराज कुलकर्णी यांनी केले.---------------------------यासाठीच हा प्रयत्नप्रास्ताविकात मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे म्हणाले, युवकांना करिअरच्या दृष्टीने मार्गदर्शन व्हावे, सेवासुविधा केंद्राच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या हेतूने या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवल्याचे सांगितले. करिअर केंद्राच्या माध्यमातून दर महिन्याच्या दुसºया शनिवारी नामवंत व्याख्यात्यांना बोलावून युवकांना मार्गदर्शन केले जाणार असल्याचे सांगितले. भारतभर असेच कार्य व्हावेप्रतिष्ठानच्या विविध उपक्रमांचे कौतुक करीत मातृभूमी प्रतिष्ठानचे कार्य हे एकदिलाने व प्रामाणिकपणे सुरु आहे़ याबरोबरच जीवनात स्थिरस्थावर झालेल्या माणसांनी एकत्र येऊन समाजासाठी काम करायचे ठरवल्यास किती चांगले काम उभारु शकते हे दाखवून दिले आहे़ अशा प्रकारचे कार्य सर्व भारतभर उभे रहावे, अशी अपेक्षा अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केली़ 

टॅग्स :SolapurसोलापूरOm Prakashओम प्रकाश