शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लातूर येथे ९ ते ११ फेबु्रवारी दरम्यान दुसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलन, अभिमन्यू टकल यांची माहिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 12:11 IST

दुसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क (टाऊन हॉल) लातूर येथे दि. ९ ते ११ फेब्रुवारी रोजी होणार आहे, अशी माहिती संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देपहिले आदिवासी धनगर साहित्य संमेलन सोलापुरात यशस्वीरित्या पार पडलेधनगर समाजाच्या शेळी, मेंढी विकासासाठी १००० कोटींची मागणी केली९ फेब्रुवारी रोजी धनगर समाजाच्या संस्कृतीचे दर्शन करणारी दिंडी आयोजित करण्यात आली

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १३ : दुसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क (टाऊन हॉल) लातूर येथे दि. ९ ते ११ फेब्रुवारी रोजी होणार आहे, अशी माहिती संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले यांनी पत्रकार परिषदेत दिली. पहिले आदिवासी धनगर साहित्य संमेलन सोलापुरात यशस्वीरित्या पार पडले. सोलापूरच्या धनगर साहित्य संमेलनाच्या यशस्वितेचे कौतुक महाराष्ट्र शासनातर्फे कॅबिनेट मंत्री राम शिंदे यांनी केले होते. संमेलनामध्ये केलेल्या पाच ठरावांपैकी तीन ठराव निकालात काढले आहेत. त्यामध्ये सोलापूर विद्यापीठाचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. धनगर समाजाच्या शेळी, मेंढी विकासासाठी १००० कोटींची मागणी केली होती, पैकी २५० कोटी यशवंतराव होळकर महामेष योजना पशू व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर व कॅबिनेट सचिव आबासाहेब जºहाड यांच्यामार्फत मंजूर केले आहे. ठराव क्र. १ धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू झाले पाहिजे होते; मात्र याबाबत आशा आहे. शासन वेळ घेईल पण मागणी मान्य करेल. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, सुभेदार मल्हारराव होळकर, आद्य क्रांतिकारक छत्रपती यशवंतराव होळकर, आद्य क्रांतिकारक भीमाबाई होळकर यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झालो, असेही यावेळी डॉ. अभिमन्यू टकले यांनी सांगितले. दि. ९ फेब्रुवारी रोजी धनगर समाजाच्या संस्कृतीचे दर्शन करणारी दिंडी आयोजित करण्यात आली आहे. दि. १० फेब्रुवारी रोजी भंडारा उधळून धनगर समाजाच्या ऐतिहासिक महापुरुषाचे हार घालून ज्येष्ठ साहित्यिक व मान्यवरांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले जाईल. नंतर दिवसभर तीन परिसंवाद घेतले जातील. दि. ११ फेब्रुवारी रोजी विविध विषयांवर परिसंवाद होतील आणि सायंकाळी समारोप होईल, असेही डॉ. अभिमन्यू टकले यांनी सांगितले. यावेळी संभाजीराव सूळ, अमोल पांढरे, अर्जुन सलगर, सचिन देशमुख उपस्थित होते. -------------------------संमेलनाच्या अध्यक्षपदी संगीता धायगुडे- संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका संगीता उत्तम धायगुडे यांची निवड करण्यात आली आहे. संगीता धायगुडे या सध्या मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे शिक्षण इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंत आंधळी, ता. माण, जि. सातारा येथे झाले आहे. समाजशास्त्र विषयात एसएनडीटी महाविद्यालयातून पदवी व एम.ए. मराठी या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांचे ‘हुमाना’ हे आत्मकथन सध्या जगभरात गाजत आहे. त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या संस्थेकडून लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार, डॉ. द. ता. भोसले पुरस्कार मिळाला आहे. ‘प्रिय आयुष्यास सप्रेम नमस्कार’ हा कवितासंग्रह प्रचंड गाजला आहे. असे अनेक उल्लेखनीय कार्य संगीता धायगुडे यांचे आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूर