शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

विश्व ‘योगगुरू’च्या दिशेने भारताची वाटचाल

By admin | Updated: June 21, 2017 11:34 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर : महेश कुलकर्णीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावावरून भारतासह जगातील १७४ देशांत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत आहे. जग खऱ्या अर्थाने इंडियाला फॉलो करीत आहे. योगा म्हणजे एक जीवनपद्धती आहे. शरीर, मन आणि बुद्धीची एकात्मता साधणारा योगा करण्याचा ‘योग’ विश्व योग दिनामुळे सर्वांना आला आहे. योग दिन साजरा करण्यासाठी या जीवनपद्धतीचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्या सोलापुरातील अनेक संस्था, विद्यार्थी, शिक्षक, संस्थांमधील कर्मचारी परिश्रम घेत आहेत. योग म्हणजे प्राचीन भारतीय परंपरा व संस्कृतीची अमूल्य देणगी आहे. योग हा केवळ व्यायाम नव्हे तर शरीर, मन, विचार, कर्म, आत्मसंयम आणि पूर्णत्व यांना एकत्रित करण्याची साधना आहे. निसर्ग आणि मानव यांना जोडणारा दुवा म्हणूनही योगाकडे पाहिले जाते. योगामुळे शरीरातील आंतरिक अवयवांना व्यायाम मिळून आरोग्यप्राप्ती होते. आरोग्य हीच धनसंपदा आहे. हे लोकांच्या मनात ठासून भरण्याचे काम देशात आणि देशाबाहेरील अनेक योगगुरूंकडून आयोजित शिबिरांद्वारे केले जाते. योग, प्राणायाम केल्याने मनाची एकाग्रता वाढते. एकाग्रतेमुळे जी उर्जा मिळते ती आपला उत्साह वाढवते. कोणतेही काम करण्यास हा उत्साह निश्चितच उपयुक्त ठरतो. योगाचे हे फायदे आणि हा योग भारतातच जास्त प्रचलित असल्याने या भारतीय संस्कृतीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार होत आहे. साहजिकच विश्व योगगुरु होण्याचं स्वप्नही भारतवासीय बाळगून आहेत.------------------------------योग म्हणजे काय ?जीव आणि विश्वाचे नियंत्रण करणारी शक्ती म्हणजे शिव आणि त्यांचे एकत्रीकरण म्हणजे योग. आधुनिक शास्त्राप्रमाणे हे विश्व म्हणजे एकाच तरंगलहरीच्या विविध रुपांचे दर्शन होय. ज्या कुणाला विविधतेमधील या एकत्वाची जाणीव झाली तो योगी. त्याने प्राप्त केलेली जीवनाची अवस्था म्हणजे मुक्ती किंवा निर्वाण किंवा कैवल्य, मोक्ष होय. आत्मसाक्षात्कार घडविण्यासाठी शरीर व मन यांचे एकत्रीकरण साधण्याच्या विविध मार्गांचे अंतरंग शास्त्र योग उलगडून दाखविते. जीवनाचे अंतिम उद्दिष्ट गाठण्याच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करून खरा आणि शाश्वत आनंद मिळविण्याचा योग हा एक मार्ग होय. --------------------------संयुक्त राष्ट्र परिषदेच्या महासभेत मान्यतायोग, प्राणायाम केल्याने आयुष्य तर वाढतेच आणि ते सुंदरही बनते. हाच धागा पकडून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव २७ सप्टेंबर २०१४ च्या महासभेत आला. बाबा रामदेवांनी २००६ पासूनच विविध देशांमध्ये योग शिबिरे घडवून आणल्यामुळे योगाचे महत्त्व ज्या-त्या देशांमधील नागरिकांनी जाणले आहे. त्यामुळेच ११ डिसेंबर २०१४ च्या संयुक्त राष्ट्र परिषदेच्या महासभेत दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याच्या प्रस्तावाला १९३ देशांपैकी १७७ देशांनी एकमताने मान्यता दिली.