शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
3
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
4
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
5
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
6
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
7
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
8
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
9
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
10
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
11
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
12
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
13
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
14
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
15
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
16
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
17
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
18
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
19
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
20
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू

पेनूर, लांबोटी, पोखरापूर खवणी ग्रामपंचायतीत सत्तांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:24 IST

येथील शासकीय गोदामात सकाळी साडेआठ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी जीवन बनसोडे सहायक निवडणूक अधिकारी राजशेखर लिंबारे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीला ...

येथील शासकीय गोदामात सकाळी साडेआठ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी जीवन बनसोडे सहायक निवडणूक अधिकारी राजशेखर लिंबारे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीला सुरुवात झाली. झालेल्या मतमोजणीचा अंतिम निकाल ४ वाजेपर्यंत चालला. तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या पेनूर ग्रामपंचायतीमध्ये पंचायत समितीचे माजी उपसभापती मानाजी माने यांच्या पॅनलला धक्का देत सर्वपक्षीय युवकांच्या आघाडीला बहूमत मिळाले. पेनूरमधील सतरा विजयी उमेदवारांची मिळालेली मते पुढीलप्रमाणे - प्रभाग क्रमांक १- गिरीश गवळी ४९५, सज्जू शेख ४६६, मयूरी चवरे ४९३, प्रभाग क्रमांक २-चरण चवरे ६८८, ताई गवळी ६९०, छाया चवरे ६६१, प्रभाग क्रमांक ३-शिवसागर गायकवाड ५६४, कावेरी चवरे ५५१, प्रभाग क्रमांक ४-रामदास चवरे ४२८, वर्षा सलगर ३८२, जयश्री रणदिवे ३६९, प्रभाग क्रमांक ५-रजनीकांत चवरे ५१६, अनिता पाटकळे ५२६, उज्ज्वला माने ५५१, सुजित आवारे ३१८, विठ्ठल माने २९५, सुजाता गवळी ३१०.

लांबोटीमध्येही अनेक वर्षांपासून जि. प. सदस्य तानाजी खताळ यांची ग्रामपंचायतीवर सत्ता होती. यंदा छेद देत मतदारांनी राष्ट्रवादीचे माजी पं. स. सदस्य सज्जन पाटील यांच्या गटाला ६ जागांवर विजयी केले. तर खताळ गटाला तीन जागा मिळाल्या. त्यामध्ये विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे प्रभाग क्रं १- नितीन चंदनशिवे ३५६, सुनीता चंदनशिवे ३७२, शुभांगी चंदनशिवे ३९६, प्रभाग क्रमांक २- भारत होनमाने २८३, मनीषा खताळ २९२, विलास शिंदे ३००, प्रभाग क्रमांक ३- मोनिका मिरजे ३४२, लक्ष्मी पाटील ३४४, अमित पाटील ३२१ असे उमेदवार विजयी झाले

कुरुल ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा पं. स. सदस्य जालिंदर लांडे गटाने विजय मिळवला. त्यामध्ये ११ जागा मिळवल्या. तर सर्वपक्षीय विरोधकाला सहा जागा मिळाल्या. निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे-प्रभाग क्रमांक १- बाळू लांडे ५०४, तानाजी गायकवाड ५१४, अंजली गायकवाड ५१५, प्रभाग क्रमांक २- सीताराम लांडे ३९३, मोहिनी घोडके ४४३, शीला माने ३८५, प्रभाग क्रमांक ३- चंद्रकला पाटील ३४७, रोहिणी तगवाले ३३४, प्रभाग क्रमांक ४- गहिनीनाथ जाधव ४८१, कल्पना जाधव ३५४, रुक्मिणी माळी ४३५, प्रभाग क्रमांक ५- प्रकाश जाधव ४७०, कविता निकम ४१६, संगीता शिंदे ४४४, पांडुरंग जाधव ३५२, सुभाष माळी ३३६, शन्नू शेख ३७६ आदी उमेदवारांनी विजय मिळवला.

पोखरापूरमध्येे गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीवर असलेल्या माजी सभापती यशवंत नरुटे यांच्या गटाला धक्का देत विकास आघाडीने सर्वच्या सर्व १३ जागा जिंकल्या. यामध्ये विजय उमेदवार - प्र. क्र.१: आशीष आगलावे ४६०, धनश्री भोसले ४३९, प्रभाग क्र. २: आप्पा खंदारे (३५०), सानिका बालाजी नरुटे ३४३, आशाबाई माने ३६८, प्रभाग क्रमांक ३: अंकुश दळवे २७८, श्यामल खंदारे २६४, नंदा लेंगरे २५०, प्रभाग क्रमांक ४: राजकुमार दळवे २९९, संगीता नरुटे २८५ , स्मिता काकडे ३२९, प्रभाग क्र.५: बजरंग लेंगरे ३५८,आशा खंदारे ३५१ हे उमेदवार विजयी झाले.

इतर ग्रामपंचायतीमध्ये अंकोली ग्रामपंचायतीच्या ११ पैकी अशोक क्षीरसागर गटाला ८ तर साहेबराव पवार गटाला ३ जागा मिळाल्या. तर शेटफळमध्ये विजयराज डोंगरे गटाला १० जागा मिळाल्या तर विरोधकांना तीन जागा मिळाल्या. वाळूज ग्रामपंचायतीमध्ये बबन दगडे गटाला नऊ जागा राजकुमार पाटील गटाला दोन जागा मिळाल्या पाटकूलमध्ये जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर देशमुख यांच्या गटाला आठ जागा मिळाल्या राष्ट्रवादीचे सातपुते गटाला ७ मिळाल्या.

जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या नरखेड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जि. प. सदस्य उमेश पाटील यांच्या गटाला १२ जागा मिळाल्या, तर एक जागा विरोधकाना मिळाली. त्या ठिकाणी नोटाला ४३४ मते मिळाली आहेत.

सावळेश्वर ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादीचे धनाजी गावडे गटाला ६ जागा मिळाल्या. तर पंचायत समितीच्या माजी सभापती समता गावडे यांच्या गटाला पाच जागा मिळाल्या.

टाकळी सिकंदर मध्ये भीमा परिवाराला मतदारांनी यंदाच्या निवडणुकीत धक्का दिला त्यांना केवळ दोन जागा मिळाल्या तर राष्ट्रवादीच्या गटाला सात जागा व काँग्रेसचे भीमराव वसेकर यांच्या गटाला सहा जागा मिळाल्या. कोरवली ग्रामपंचायतीत शिवानंद पाटील गटाला ९ जागा मिळाल्या तर राजशेखर पाटील गटाला फक्त २ जागा मिळाल्या. ढोक बाबुळगाव ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना पुरस्कृत आघाडीला सात जागा विरोधी गटाला चार जागा मिळाल्या. खवणीमध्ये गेल्या ३० वर्षांपासून असलेली राष्ट्रवादीची एकहाती सत्ता उलथवून लावत संजीव खिलारे यांच्या आघाडीला ७ पैकी ५ जागा मिळाल्या. दादपूर ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादीच्या गटाला ९ च्या ९ जागा मिळाल्या आहेत पेनूर ग्रामपंचायतीत परिवर्तन झाल्या नंतर युवकांनी पेनूर येथे जल्लोष केला

-----