शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीणमधील कोरोना संसर्गात वाढ; नऊ दिवसात ९७ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 11:09 IST

इकडे सोलापूर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाºयांना लागले बदल्यांचे वेध

ठळक मुद्देबार्शी, माढा, करमाळा, माळशिरस, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला तालुक्यात संसर्ग वाढल्याचे चित्र कोरोना संसर्गाची सुरुवात मोहोळ, दक्षिण सोलापूर, अक्कलकोटपासून झाली, पण आता हे तालुके मागे पडले कोरोनाचा संसर्ग वाढल्यावर आरोग्य मंत्र्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाºयांनी सोलापुरात धाव घेऊन यंत्रणा लावली

सोलापूर : ग्रामीण भागात कोरोनाच्या संसर्गात वाढ होत असल्याचे चित्र असताना आरोग्य विभागातील अधिकाºयांना बदल्यांचे वेध लागल्याचे चित्र जिल्हा आरोग्य विभागाच्या कार्यालयातील वातावरणावरून दिसून आले. कोरोना संसर्गाबरोबरच आता मृत्यूमध्येही ग्रामीण भागाने सोलापूर शहराला मागे टाकले आहे. बुधवारी शहरात मृत्यूची संख्या ४३५ तर ग्रामीणमध्ये ४३९ इतकी झाली आहे. ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १४ हजार ९१६ तर मृत्यूंची संख्या ४३९ इतकी झाली आहे. बुधवारी ग्रामीण भागात ३९४ जण पॉझिटिव्ह आढळले तर २० जणांचा मृत्यू झाला आहे. सप्टेंबर महिन्यात ९ दिवसात ९७ जणांचा मृत्यू झाला आहे तर रुग्णांमध्ये ३ हजार २०२ नी वाढ झाली आहे. 

बार्शी, माढा, करमाळा, माळशिरस, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला तालुक्यात संसर्ग वाढल्याचे चित्र दिसत आहे. बार्शी तालुक्यात सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण आहे तर त्याखालोखाल पंढरपूर, माढा, अक्कलकोट तालुक्यांचा समावेश आहे. कोरोना संसर्गाची सुरुवात मोहोळ, दक्षिण सोलापूर, अक्कलकोटपासून झाली, पण आता हे तालुके मागे पडले आहेत.

तालुक्यातील मृत्यू बार्शी : ११७, पंढरपूर: ७०, माढा: ४७, अक्कलकोट: ४४, माळशिरस: ३८, मोहोळ: २९, करमाळा: २५, दक्षिण सोलापूर: २३, उत्तर सोलापूर: २२, मंगळवेढा: १५, सांगोला: ९.

वरिष्ठ अधिकाºयांचे दुर्लक्षमहानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग वाढल्यावर आरोग्य मंत्र्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाºयांनी सोलापुरात धाव घेऊन यंत्रणा लावली. पण आता ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढत असताना आरोग्य मंत्री व आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकारी सोलापूरकडे फिरकले नाहीत, अशी तक्रार आनंद तानवडे यांनी केली आहे. जिल्ह्याच्या स्थितीबाबत बैठक घ्यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय