शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

केसर आंब्यावर भुरी अन् तुडतुड्या रोगाचा प्रादुर्भाव; मोहोर व आंबा गळतीमुळे उत्पादन यंदा  घटणार

By विठ्ठल खेळगी | Updated: March 6, 2023 13:41 IST

सांगोला तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील डाळिंब  मर, तेलकट व पिन होल बोरर या रोगाच्या प्रादुर्भावामुळे नष्ट होऊ लागले त्यामुळे डाळिंब रोगावर वैतागलेल्या शेतकऱ्यांनी डाळिंब बागा काढल्या

सोलापूर/सांगोला :सततच्या हवामान बदलामुळे सांगोला तालुक्यातील केशर आंबा बागांवर पडलेल्या भुरी व तुडतुड्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मोहोर गळती वाढल्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. तर महागडे औषधे बागांवर फवारणी करूनही रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्याचे नावच घेत नाही. त्यामुळे सततच्या फळ गळतीमुळे यंदा आंबा उत्पादन घटणार असल्याचे संकेत शेतकऱ्यांनी दिले आहेत.

 सांगोला तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील डाळिंब  मर, तेलकट व पिन होल बोरर या रोगाच्या प्रादुर्भावामुळे नष्ट होऊ लागले त्यामुळे डाळिंब रोगावर वैतागलेल्या शेतकऱ्यांनी डाळिंब बागा काढल्या व पीक पद्धत बदलून केशर आंबा, तैवान पेरू, गोल्डन सिताफळ ,आवळा ,पपई, कलिंगड ,खरबूज असे फळ लागवडीकडे वळला आहे. सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुमारे १ हजार हेक्टर क्षेत्रावर केशर आंबा लागवड केली आहे. चालू वर्षी नोव्हेंबर मध्ये बागांना पहिला मोहोर निघाला. परंतु तो फारसा तग धरू शकला नाही. त्यानंतर हवामान बदलामुळे डिसेंबर व फेब्रुवारी मध्ये दुसऱ्या बहारात मोहोर निघाला. बागा मोहोराने बहरलेल्या असताना भुरीमुळे मोहोर पांढरा पडून तर तुडतुड्या रोगामुळे बागेवर चिकटपणा येऊ लागल्याने फळे गळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे. एकीकडे डाळिंब उध्वस्त झाल्या असताना दुसरीकडे शेतकरी फळपीक बदलून उभारी घेण्यासाठी धडपडत आहे. अशातच केशर आंबा बागांवर पडणाऱ्या रोगामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.

बागेवर १४ फवारण्या करूनही गळती थांबेनामहूद येथील प्रयोगशील शेतकरी दिलीप नागणे यांनी २ एकर क्षेत्रावर केशर आंबा लागवड केला आहे. यंदा हवामान बदलामुळे डिसेंबर व फेब्रुवारी झाडांना मोहोर येण्यास सुरुवात झाली मात्र मोहोराने झाडे बहरली असताना बागेवर भुरी व तुडतुड्या रोगाच्या प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून आले म्हणून त्यांनी रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी आत्तापर्यंत बागेवर १४ फवारण्या करुनही फळ गळती थांबत नाही.त्यामुळे यंदा आंब्याचे उत्पादन घटणार असल्याचे नागणे सांगितले.शेतकऱ्यांनी आंबा मोहोर संरक्षणासाठी हेक्झाकोनझोल १० मिली किंवा बावीस्टीन १० ग्राॅम प्लस योग्य किंवा क्विनाॅलफाॅस-१५मिली प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे बागेवर फवारणी करावी. -शिवाजी शिंदे, तालुका कृषी अधिकारी

टॅग्स :MangoआंबाFarmerशेतकरी